voting SaamTV
महाराष्ट्र

धुळ्याहून काेकणात गेले मतदानास; मयताचा शिक्का पाहून बसला धक्का

या प्रकारामुळे निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार मात्र समोर आला आहे.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात चार नगरपंचायतीसाठी आज (मंगळवार) मतदान सुरु आहे. याचं दरम्यान वैभववाडीतील मतदान केंद्र क्रमांक आठवर जिवंत मतदाराला मयत ठरविल्याचा प्रकार मतदार मतदानासाठी आल्यावर समाेर आला.

वैभववाडी (vaibhavwadi) नगरपंचायत निवडणुकीत (election) निवडणूक विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला. जिवंत मतदाराला मयत म्हणून शिक्का मारून सुरवातीला त्याला मतदान (voting) करण्यास अटकाव करण्यात आला. यामुळे मतदान केंद्रावर काही गाेंधळ निर्माण झाला. पालिकेच्या मुख्याधिका-यांनी कागदपत्रांची खातरजमा करून संबंधित व्यक्तीस मतदानाचा हक्क बजाविण्यास संमती दिली.

भिकाजी वाडीले हे आज वैभववाडी येथे मतदान करण्यासाठी मतदान केंद्र क्रमांक आठ येथे आले. यावेळी त्यांनी मतदार यादी पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. मतदार यादीतमधील त्यांच्या नावासमोर मयत असा शिक्का मारण्यात आला होता. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील अधिका-यांना चूक निदर्शनास आणून दिली. या प्रकारामुळे बराच वेळ केंद्रावर गोंधळ सुरु हाेता.

अखेरीस पालिकेचे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी तिथे येत खातरजमा करून त्यांना मतदान करण्यास परवानगी दिली. तब्बल एक तासाच्या गोंधळानंतर अखेर वाडीले यांनी मतदान केले. या प्रकारामुळे निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार मात्र समोर आला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT