Sindhudurg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: शिमगोत्सवादरम्यान भयंकर घडलं! कारखाली चिरडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू, अपघातावेळी खिडकीतून खाली पडला नंतर...

Sindhudurg Car Accident: सिंधुदुर्गमध्ये शिमगोत्सवादरम्यान भीषण कार अपघात झाला. कार पुलावरून खाली कोसळली. या अपघातामध्ये ४ वर्षांच्या मुलाचा कारखाली चिरडून मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • शिमगोत्सवादरम्यान सावंतवाडीत भीषण अपघात

  • ४ वर्षांच्या चिमुकल्याचा कारखाली चिरडून मृत्यू

  • कार पुलावरून खाली पडली यावेळी खिडकीतून पडलेल्या मुलावर कार कोसळली

  • अपघातात इतर प्रवासी सुरक्षित आहेत

शिमगोत्सवादरम्यान चिमुकल्याचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. सावंतवाडीतील बांदा खामदेव नाका येथे ही घटना घडली. कार पुलावरून खाली कोसळली. कारच्या खिडकीतून ४ वर्षांच्या मुलगा खाली पडला. या मुलाच्या अंगावर कार पडली. कारखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये कारमध्ये असलेले इतर सर्वजण सुरक्षित आहेत. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. बांदा इन्सुली खामदेव नाका येथे झालेल्या कार अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झाला. पुलावरून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली. कारच्या खिडकीतून ४ वर्षांचा मुलगा आधी खाली पडला. या चिमुकल्याच्या अंगावर कार पडली. कारखाली चिरडून सावंतवाडीतील या मुलाचा मृत्यू झाला.

चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये कारमध्ये बसलेले इतर सर्वजण सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. चिमुकल्याचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. संबंधित मुलाचे वडील हे एका शासकीय कार्यालय चालक म्हणून कार्यरत आहेत अशी माहिती मिळत आहे. अधिक तपास बांदा पोलिस करत आहेत.

दरम्यान, कोल्हापुरात उकळत्या दुधात पडून २ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यातल्या तेरवाड गावातील पाटील मळ्यात ही घटना घडली. मंचरी ज्ञानेश्वर खोत असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव होते. २४ फेब्रुवारीला मंचरी उकळत्या दुधाच्या पातेल्यात पडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मंचरीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. २० वर्षांनंतर झालेल्या बाळाचा असा करुण अंत झाल्यामुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Amravati Crime : दफन केलेला तरुणाचा मृतदेह २३ दिवसांनी पुन्हा थडग्याबाहेर काढला; धक्कादायक आलं समोर?

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT