SAMEER KADAM DEATH saam tv
महाराष्ट्र

गणेशोत्सवात अचानक काळीज पिळवटून टाकणारी बातमी; डबलबारीच्या सम्राटाची अचानक एक्झिट, भजनक्षेत्रात शोककळा

Double Bari Maestro Sameer Bua Passes Away Suddenly: सिंधुदुर्गातील लोकप्रिय भजनी कलाकार आणि डबलबारीचे सम्राट समीर कदम यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने भजन क्षेत्रावर शोककळा पसरली असून भजनप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Omkar Sonawane

विनायक वंजारे, साम टीव्ही

गणेशोत्सवाचा उत्साह... बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष... आणि याच आनंदाच्या वातावरणात सिंधुदुर्गातून आली मन सुन्न करणारी दुःखद बातमी... डबलबारीचे सम्राट, भजन क्षेत्रातील लोकप्रिय बुवा समीर कदम यांची अचानक एक्झिट झाली आहे. समीर कदम यांच्या निधनाने सिंधुदुर्गातील भजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ऐन गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बुवाच्या जाण्याने भजनप्रेमी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

समीर बुवा म्हणजे केवळ एक उत्तम भजनी कलाकार नव्हते. तर आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि दिलखुलास वागण्याने त्यांनी असंख्य माणसं जोडली होती. डबलबारीत आपल्या कलेची छाप उमटवत अनेक दिग्गज बुवांना आपल्या गायकीने पाणी पाजणाऱ्या या अवलियाने भजन क्षेत्रात आपलं अढळ स्थान निर्माण केलं होतं. कुडाळ, कणकवली, विजयदुर्ग, राजापूर अशा अनेक ठिकाणी भजनाच्या कार्यक्रमांसाठी त्यांचा प्रवास.. रात्री उशिरापर्यंतच्या गप्पा.. मित्रांसोबतच्या आठवणी.. आणि रस्त्यात भेटल्यावर ‘ओ बुवा... फोटो काढूया!’ म्हणत होणारी आपुलकीची हाक.. या सगळ्या आठवणी आता केवळ स्मृती बनून राहणार आहेत.

स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता, जागरण झालं तरी त्याच उत्साहाने भजन करणारा हा कलाकार... आज पहाटे कायमचा निघून गेला...‘खय आसस? ह्या आयक... माका सांग... असा त्यांचा फोन पुन्हा कधीच येणार नाही. ही जाणीवच मनाला चटका लावून जाणारी आहे... भजन क्षेत्रातील हा लोकप्रिय आवाज आता कायमचा शांत झाला आहे. सिंधुदुर्गने आपला एक अवलिया भजनी कलाकार गमावला आहे. समीर बुवा यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lasanache Pani: फक्त ३० दिवस प्या लसणाचे पाणी, शरीराला होतील फायदेच फायदे

BRICS : भारताने ब्रिक्सला 'दिशाहीन' होण्यापासून कसे वाचवले? दिल्ली जाहीरनाम्यातील 'ते' ५ मोठे निर्णय

Lakshmi Money Mantra : कर्जाचा डोंगर झालाय? ‘हे’ 4 मंत्र डोक्यावरचा भार करतील कमी, जाणून घ्या उपाय

Shiv Sena Symbol: आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तीच राजकीय फूट; शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद, वाचा सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra News Live Update: आमदार राजेश पाडवी यांनी नाशिकमध्ये घेतली आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट

SCROLL FOR NEXT