Sindhudurg News, Sindhudurg Crime News, superintendent of police saurabh agarwal saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg News : सिंधुदुर्ग एलसीबीची माेठी कामगिरी, ४५ गुन्हे दाखल असलेल्या गोव्यातील गुन्हेगाराला अटक; पैसे मोजण्याच्या मशीनसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

या धडक कारवाईमुळे सिंधुदुर्ग पाेलिसांचे काैतुक हाेऊ लागले आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg Crime News : महाराष्ट्र (maharashtra), गोवा (goa) राज्यासह कर्नाटक (karnataka) राज्यात घरफोडीचे ४५ गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगारास सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश विनायक पाटील (वय ३७) असे संशयित आराेपीचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.(Maharashtra News)

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कणकवली तालुक्यातील वागदे येथील राहत्या घरातून प्रकाश यास अटक केली. मूळ गोवा येथून फरार असलेला प्रकाश हा आंतरराज्य गुन्हेगार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल (superintendent of police saurabh agarwal) यांनी दिली.

पाेलिसांनी त्याच्याकडील एक गावठी कट्टा, तीन जिवंत राऊंड, एक काडतूस, २७ जिवंत काडतुसे, पाच तलवारी, चार लाख ६९ हजार ९५० रुपयांची रोख रक्कम, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, ११ विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट, १६६ ग्रॅम १६ मिली वजनाचे ९ लाख ६८ हजार ४९० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, पाच किलो ३०० ग्रॅम वजनाचे ३ लाख ३५ हजार ८४४ रुपये किमतीच्या चांदीच्या विटा व दागिने जप्त केल्याचे (sindhudurg) एसपी अग्रवाल यांनी नमूद केले.

या बराेबरच त्याच्याकडील पैसे मोजण्याची इलेक्ट्रिक मशीन, सोने चांदी वितळण्याची इलेक्ट्रिक मशीन, तीन ड्रील मशीन, एक दुचाकी, एक चार चाकी असा एकूण ३० लाख ४८ हजार ७८४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे सिंधुदुर्ग पाेलिसांचे (police) काैतुक हाेऊ लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

SCROLL FOR NEXT