Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू; गुरे चारण्यासाठी गेली असताना घडली घटना

Sindhudurg News गुरे चारण्यासाठी गेलेल्या द्रौपदी मारुती नाईक असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे

Rajesh Sonwane

विनायक वंजारे 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस होत आहे. यात अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडत आहे. अशाच प्रकारे गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ, बेरडकी येथे घडली आहे. 

गुरे चारण्यासाठी गेलेल्या द्रौपदी मारुती नाईक असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीचा (Rain) पाऊस होत आहे. या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी विजा पडल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये जीवितहानी देखील झाल्या आहेत. अशाच प्रकारे परतीच्या पावसात (Lightning Strike) वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. 

दरम्यान याच परिसरात चार दिवसांपूर्वी येथूनच काही अंतरावर आड्याष्टा येथे पाण्यात वीज पडून एक दुभती म्हैस व एक रेडा जागीच जळून ठार झाला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी अचानक विजेच्या गडगडाटासह या परिसरात पाऊस कोसळत असताना या महिलेवर वीज पडून तिचा दुर्दैवी अंत झाला. गुरे चारण्यासाठी गेलेली महिला घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर सदरची घटना उघडकीस आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT