sindhudurg cashew growers seek msp of rs 200 per kg or will boycott voting for loksabha election saam tv
महाराष्ट्र

Cashew Growers Seek MSP of Rs 200 Per Kg : काजूला हमीभाव द्या, अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

Konkan News : काजूचे आयात शुल्क कमी असल्याने परदेशातील काजू येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे असे काजू उत्पादक शेतक-यांचे म्हणणे आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg :

कृषी विद्यापीठाच्या धोरणानुसार व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार काजूला किलो मागे दोनशे रुपयांचा हमीभाव मिळावा. आयात शुल्क वाढवावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आगामी काळातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतक-यांनी राज्य सरकारला दिला आहे. (Maharashtra News)

सरकारने काजू बी मंडळाच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी धोरण स्विकारले आहे. काजूला प्रतिकिलो 135 रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांसमवेत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर (deepak kesarkar) यांनी सावंतवाडी येथे नुकतीच बैठक घेतली.

या बैठकीत मंत्री केसरकर यांनी काजू खरेदीच्या धोरणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. काजू बी खरेदी करण्याबाबत सरकारने धोरण स्विकारल्याचे सांगितले. स्वतंत्र काजू मंडळाच्या माध्यमातून काजू बी खरेदी करण्यासाठी सरकारने मान्यता दिल्याचे केसरकर यांनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या निर्णयावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काजू बी यास प्रतिकीलो दोनशे रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी शेतक-यांनी करून सरकारच्या धोरणाला विरोध केला आहे. दोनशे रुपये हमीभाव देणार नसाल तर शेतकरी सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकेल व रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील सरकारला शेतक-यांनी दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोनशे रुपये काजूला हमीभाव मिळण्यासाठी आठही तालुक्यात आंदोलन सुरू केली आहेत. दरम्यान काजू आयात शुल्क वाढवावे ते कमी असल्याने परदेशातील काजू येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कृषी विद्यापीठाच्या धोरणानुसार व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किलो मागे दोनशे रुपये हमीभाव मिळावा आणि आयात शुल्क वाढवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT