Saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg Private Bus accident : कोकणातून मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांचा बसचा भीषण अपघात, ६० जण करत होते प्रवास

sindhudurg private bus accident at konkan : कोकणातून मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांचा बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये ६० जण प्रवास करत होते.

Vishal Gangurde

विनायक वंजारे, साम टीव्ही प्रतीनिधी

सिंधुदुर्ग : कोकणात गणपतीसाठी गेलेले चाकरमानी पुन्हा घरी परतायला सुरुवात झाली आहे. काही रेल्वे मार्गे आणि रस्तेमार्गे मुंबईतील घराकडे येत आहेत. रेल्वेत आरक्षण सीट शिल्लक नसल्याने अनेकांनी रस्तेमार्गे असणाऱ्या वाहनांचा आधार घेतला आहे. अनेक जण बस आणि खासगी प्रवासी वाहनांनी घराकडे निघाले आहेत. त्यामुळे या खासगी वाहनांतही गर्दी पाहायला मिळत आहे.

सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला शिरोडा येथून चाकरमान्यांना घेऊन मुंबईला निघालेली खासगी बस तुळस येथे उलटली आहे. या खासगी बस समोरील वाहनाला बाजू देताना ब भातशेतीत कोसळली आहे. या खासगी बसमध्ये ५५ ते ६० प्रवासी होते. समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देत असल्याने बसचा वेग कमी होता. त्यामुळे बस जागेवरच उलटली. त्यामुळे मोठा भीषण दुर्घटना टळली आहे.

या भीषण अपघातात ७ ते १० प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पूर्ण क्षमतेने घेऊन जाणाऱ्या बसचा हा अपघात झाला आहे. दरम्यान, गणपतीआधी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या परिस्थितीवरून कोकणकरांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.

मागील वर्षांप्रमाणे यंदाही तशीच काहीशी परिस्थिती होती. या भीषण अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतीचा धाव घेतला होता. त्याचबरोबर त्यांनी जखमी प्रवाशांचे प्राथमिक उपचार करत धीर देण्याचं काम केले होते.

या बसमध्ये ५५ ते ६० प्रवासी होते. या अपघातात ८ ते १० जण जखमी झाले आहेत. तर त्यांना वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT