Sindhudurg Vengurla Port Boat Accident Saamtv
महाराष्ट्र

Sindhudurg Boat Accident: वेंगुर्ले बंदरात बोट उलटून मोठी दुर्घटना! चारही खलाश्यांचे मृतदेह सापडले; शोधमोहिम थांबली

Sindhudurg Vengurla Port Boat Accident: अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि उधाणामुळे बोटीने आपला मार्ग बदलला व ती भरकटली. बोट बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये तीन मध्यप्रदेशमधील तर एक रत्नागिरीमधील खलाशी होता.

Gangappa Pujari

विनायक वंजारे, प्रतिनिधी|ता. २५ मे २०२४

सिंधुदुर्ग येथील वेंगुर्ले बंदरात खलाश्यांना घेऊन जाणारी बोट पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत बोटमध्ये असलेले चारही खलाशी बुडाले होते. कालपासून या खलाश्यांचा शोध सुरू होता. आज अखेर या चारही खलाश्यांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला बंदरात बोट उलटल्याची मोठी दुर्घटना घडली होती. वेंगुर्ला बंदर येथून माश्यांचा बर्फ वगैरे घेऊन एकूण ७ खलाशी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मोठ्या बोटीच्या दिशेने निघाले होते. यावेळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि उधाणामुळे बोटीने आपला मार्ग बदलला व ती भरकटली. त्या बोटीवरील सात खलाशी यावेळी समुद्रात फेकले गेले.

या दुर्घटनेत सात खलाशी समुद्रात कोसळले होते. त्यामधील तिघांनी पोहत समुद्र किनारा गाठला होता तर आणखी चार खलाशी बेपत्ता झाले होते. कालपासून या चारही बेपत्ता खलाश्यांचा शोध सुरू होता. यापैकी काल दोन जणांचे मृतदेह हाती लागले तर आज सकाळी आणखी दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

दरम्यान, बोट बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये तीन मध्यप्रदेशमधील तर एक रत्नागिरीमधील खलाशी होता. आझाद मुनीलाल कोल, चांद गुलाल महमद, शिवराम कोल अशी मध्यप्रदेशमधील मृतांची नावे आहेत तर महादेव शंकर आंबेरकर हा रत्नागिरीमधील खलाशी आहे. प्रवरा नदीत बुडून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच समोर आलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2025 : सलमान खान ते करीना कपूर; बॉलिवूडमधील ८ सुपरकूल भावंडे

Password Security: 'हा' पासवर्ड वापरत असाल तर थांबा! हॅकर्स करू शकतात फक्त एका सेकंदात क्रॅक

देवाभाऊ महिन्याला ₹१५०० नको, लाडकीचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, साताऱ्याचे नेमकं प्रकरण काय?

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या मोबाईलचा सीडीआर सार्वजनिक करण्याची मागणी

Rules for removing rakhi: बहिणीने भावाला बांधलेली राखी मनगटावर किती दिवस ठेवावी? जाणून घ्या राखी काढण्याचे नियम

SCROLL FOR NEXT