Eknath Shinde News : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून आता आठवडा उलटलाय, पण सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळात कोण कोण असेल, हे सगळं गुलदस्त्यातच आहे. त्यातच एकनाथ शिंदे दरे गावात गेल्यानंतर महायुतीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चेला उधाण आले. तिकडे विरोधकांकडून आरोपांवर आरोप केले जात आहेत. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेनेही जोर धरला. त्यातच आता भाजपकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. भाजपकडून शपथविधीची तारीख जाहीर करत एकनाथ शिंदेंना एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. (Maharashtra Oath-Taking Ceremony Of Mahayuti Government)
महराष्ट्रातील जनतेला सत्तास्थापनेचे वेध लागले आहेत. भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख परस्पर जाहीर केली. एकनाथ शिंदे यांना भाजपने थेट सूचक इशारा दिलाय. एकनाथ शिंदेंच्या दबावत भाजप येणार नाही. एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा सूचक इशाराही यातून देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर गृहमंत्रिपदासोबत महत्त्वाची खाती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. विधानपरिषदेच्या सभापतीची मागणीही करण्यात आली होती. पण आता भाजपकडून थेट शपथविधीची तारीखच जाहीर करुन शिंदेंना सूचक इशाराच दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महायुती सरकारच्या शपथविधीची अखेर मुहूर्त ठरलाय. येत्या ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शपथविधीची तारीख ठरली, पण मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत मात्र अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्यासह देशातील भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 2 वाजता दरे गावातून निघणार आहेत. हेलिकॉप्टरने एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे एकत्र निघणार आहेत. मुख्यमंत्री जाणार असल्यानं प्रशासन सज्ज झालं आहे. एकनात शिंदे ठाण्यासाठी दुपारी आपल्या गावातून निघणार आहेत. ठाण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे आराप करणार की भेटीगाठी करणार, याचीही राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.