Sanjay Shirsath Son Saam
महाराष्ट्र

Siddhant Shirsat: चेंबूरच्या फ्लॅटवर शरीरसंबंध, लग्न अन् गर्भपात; मंत्री शिरसाटांच्या मुलावर विवाहितेचे गंभीर आरोप

Siddhant Shirsat News: शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत.

Bhagyashree Kamble

शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर एका महिलेने शरीरसंबंध, लग्न अन् गर्भपात असे गंभीर आरोप केले आहेत. सिद्धांत शिरसाट यांनी धमकावलं, बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचे गंभीर आरोप त्या महिलेने केले आहे. तसेच मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोपही त्या महिलेनं केला. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूने तपास सुरू आहे. या आरोपामुळे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उडण्याची शक्यता आहे.

महिलेने तक्रारीत काय म्हटले ?

२०१८ मध्ये सोशल मीडियावरून सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांचे संबंध अधिक घट्ट झाले. त्यांच्यामधील बोलणं आणि भेटीगाठी वाढल्या. दोघेही चेंबूरमधील एका फ्लॅटवर भेटायचे. त्या फ्लॅटवर सिद्धांत आणि महिलेमध्ये शारीरिक संबंध झाल्याचे तक्रारीत महिलेने म्हटलंय. शरीरसंबंधानंतर महिला गरोदर राहिली. मात्र, दबाव टाकत सिद्धांतने गर्भपात करायला लावल्याचंही महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं.

त्या महिलेने ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे. सिद्धांतने फसवणूक केल्याचा आरोप त्या महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. तिने दावा केला आहे की सिद्धांत यांनी तिला आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत लग्नासाठी दबाव टाकला. 'माझ्याशी लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करेन' अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग केलं होतं. त्यामुळे तिनं नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला आणि सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून लग्न केले, असा आरोपही महिलेकडून करण्यात आला आहे.

१४ जानेवारी २०२२ रोजी सिद्धांत शिरसाटने आपल्यासोबत बौद्ध पद्धतीनं लग्न केल्याचे महिलेने म्हटले आहे. याबाबतचे पुरवा असल्याचा दावाही तिने केला आहे. लग्नानंतर, सिद्धांत यांच्या वागणुकीत बदल झाला आणि छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला, असं महिलेनं सांगितलं. महिलेच्या आरोपाबाबत आम्ही मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न करत आहोत, अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.

महिलेच्या वकिलांनी सांगितले की, २० डिसेंबर २०२४ रोजी शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे, त्यांनी सात दिवसांच्या आत सिद्धांत शिरसाट यांनी तिला नांदविण्यासाठी घरी घेऊन यावे आणि न्याय द्यावा, अन्यथा महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pik Vima Yojana: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! या तारखेपर्यंत फळपीक विमा योजनेसाठी करु शकता अर्ज; वाचा सविस्तर

APMC मार्केटमधून ड्रायफ्रूट्स खरेदी करताय तर थांबा, भेसळयुक्त काजू- बदाम अन् मनुक्यांची विक्री; धक्कादायक VIDEO समोर

Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच करणार एन्ट्री

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

SCROLL FOR NEXT