Shubhangi Patil saam tv
महाराष्ट्र

Graduate Constituency Election : हे काय ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाही, शुभांगी पाटलांना अधिका-यांनी हटकलं

येत्या दाेन फेब्रुवारीला मतमाेजणी हाेणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पालकमंत्री दादा भुसे (dada bhuse) आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील हे मतदानापासून वंचित राहिले. या दाेन्ही नेत्यांचे मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. दरम्यान मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील (shubhangai patil) यांना निवडणुकीच्या (election) कामासाठी तैनात असलेल्या अधिका-याने नियमांचे उल्लंघन हाेत असल्याच्या कारणास्तव संगमनेर (Sangamner) मतदान केंद्रांवर हटकलं.

विधानपरिषदेच्या पदवीधर (Graduate Constituency Election) आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Teachers Constituency Election) पाच जागांसाठी आज (साेमवार) उत्साहात मतदान झाले. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात संपूर्ण दुपारी दोनपर्यंत 31.71 टक्के मतदान झाले आहे.

महाविकास आघाडीच्या (mva) पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील या संगमनेर येथील मतदान केंद्रावर दुपारी पोहचल्या. त्या मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना निवडणूक अधिकाऱ्याने पाहिले. त्यामुळे अधिका-यांनी शुभांगी पाटील यांना तसे करण्यापासून राेखले. मतदान (voting) केंद्रात प्रचार करत असल्याचा आक्षेप घेत परिसरातून बाहेर जाण्याच्या सूचना केल्या.

त्यावेळी पाटील आणि मतदान केंद्र अधिकारी यांची चर्चा झाली. तुम्हांला काय आणि कसे सुरु आहे हे मी दाखविताे. तुम्ही बघा कक्षात जाऊन असे अधिकारी यांनी भाेसलेंना स्पष्ट केले. त्यावेळी त्यांनी माझ्यासाेबत एक कार्यकर्ता येऊ द्या असे म्हणातच अधिका-यांनी त्यांना तुम्ही नियमांचा भंग करत आहात. ही ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुक नाही असे सुनावले. त्यावर पाटील यांनी त्यांच्या समाेर हात जोडत बाहेरचा रस्ता धरला. (Maharashtra News)

मला काेणी राेखले नाही : शुभांगी पाटील

दरम्यान महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील म्हणाल्या मला हात जोडायची सवय असून मला मतदान केंद्रात काेणीही रोखले नाही. मी स्वत:हून कामकाज पाहून बाहेर आले असा दावा देखील शुभांगी पाटील यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये अराजक स्थिती, भारतीयांसाठी मोदी सरकारकडून एडवायजरी, वाचा नेमकं काय सांगितलं

Akshay Kumar Birthday: '१५० हून अधिक चित्रपट आणि...', वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमारची खास पोस्ट, मानले प्रेक्षकांचे आभार

Vice Presidential Election: आगे आगे देखो होता है क्या; देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान|VIDEO

Nepal Banned Social Media : नेपाळ नंतर 'या' देशात सोशल मीडियावर बंदी, जाणून घ्या

Mumbai Traffic Police Viral Video: हा अधिकार कुणी दिला ? पोलिसांनी पार्किंगमधल्या धाडधाड गाड्या पाडल्या, व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

SCROLL FOR NEXT