BJP Leader Ashutosh Patil Detained 
महाराष्ट्र

BJP Leader : भाजपच्या बड्या नेत्याला मुंबई पोलिसांनी उचललं; 'त्या' प्रकरणात मोठी कारवाई, राजकारणात खळबळ

BJP Leader Ashutosh Patil Detained : श्रीवर्धन भाजप तालुकाध्यक्ष आशुतोष पाटील यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बीएमसीमध्ये लिपिक पदावर नोकरीचे आमिष दाखवून सहा तरुणांची ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Namdeo Kumbhar

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

मुंबई महानगरपालिकेत (BMC) नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन भाजपचे तालुकाध्यक्ष आणि माजी सरपंच आशुतोष अंकुश पाटील यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे श्रीवर्धनसह संपूर्ण रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदावर नोकरी लावून देतो, असे सांगून आशुतोष पाटील यांनी सहा तरुणांकडून तब्बल ९ लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. तपासादरम्यान सहा जणांची एकूण नऊ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

अटकपूर्व जामीन फेटाळताच पोलिसांची कारवाई:

या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आशुतोष पाटील यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर मुंबईतील विलेपार्ले पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी दिवेआगर येथून पाटील यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर आता स्थानिक भाजप नेतृत्व आशुतोष पाटील यांच्यावर काय कारवाई करणार आणि या प्रकरणावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यात अतिक्रमणांवर सलग दहाव्या दिवशी बुलडोझर; २.२० लाख चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटवली

Jasprit Bumrah: रोहित शर्मा झाला कॅप्टन; बुमराहने घेतला मोठा निर्णय, थेट मुंबई इंडियन्सला कळवला नकार

Accident Death : भयंकर अपघात! ऊसाच्या ट्रॅक्टरची बसला धडक, ६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Pregnancy Planning Tips: बाळासाठी प्रयत्न करताय, पण वारंवार अपयश येतंय? मग शरीरातील या एका गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका!

रोज आवळ्याचा ज्यूस कोणी पिऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT