Guru Paduka Darshan saam tv
महाराष्ट्र

Guru Paduka Darshan: श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव, भाविकांच्या उपस्थितीने सजणार 'भक्तीचा महाकुंभ'

Guru Paduka Darshan Mahakumbh Of Bhakti : मुंबईत ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ मध्ये दोन दिवस भक्तीचा महाकुंभ उत्सव रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते भक्ती-शक्ती व्यासपीठाचे उद्घाटन होईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने वरळी येथील ‘एनएससीआय डोम’ मध्ये दोन दिवसीय ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात स्थापन होणाऱ्या ‘भक्ती शक्ती व्यासपीठा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘जीवन विद्या मिशन’चे प्रल्हाददादा वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. ८) सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमामुळे भक्तांमध्ये एक अनोखा उत्साह आणि आध्यात्मिक वातावरण तयार होईल.

८ आणि ९ मार्च रोजी ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ दोन दिवसांच्या कार्यक्रमात भाविकांना २१ संत आणि गुरूंच्या मूळ पादुकांचे दर्शन घेता येईल. मुंबईत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारा ‘भक्तीचा महाकुंभ’ एकाच छताखाली भरला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार असून, प्रल्हाददादा वामनराव पै उपस्थितांचे प्रबोधन करतील. यापूर्वी, ‘सकाळ माध्यम समूहा’ने नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये यशस्वी ‘पादुका दर्शन सोहळा’ आयोजित केला होता.

या सोहळ्यात वारकरी टाळ-मृदंग वाजवत सहभागी होणार आहेत. विविध भजनी मंडळे, देवस्थाने आणि संस्थांचे कार्यकर्ते देखील उत्सवात भाग घेणार आहेत. यासोबतच, मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध कार्यालयातील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणही या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या सर्वांचा एकत्रित सहभाग उत्सवाला अधिक रंगत आणि उत्साह देईल, आणि भक्तिरसात गढून त्यांना एक अद्भुत अनुभव प्राप्त होईल.

भाविकांसाठी विविध स्टॉल्स आणि स्वच्छतागृहांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शकांना कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ नये, यासाठी मंडपात गुरु सेवकांची देखरेख असणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शनिवारी ८ तारखेला सकाळी १० वाजता ‘भक्ती शक्ती व्यासपीठ’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीत होईल. तसेच सकाळी ९ वाजता पद्मभूषण श्री. एम यांचे व्याख्यान ‘सत्संग फाउंडेशन’च्या वतीने होणार आहे.

उत्सव स्थळावर पोहोचण्यासाठी महालक्ष्मी (पश्चिम रेल्वे) आणि भायखळा (मध्य रेल्वे) ही नजीकची उपनगरीय रेल्वे स्थानके आहेत. कार्यक्रम स्थळाजवळ नेहरू तारांगण येथे बेस्टचे बस स्थानक आहे. सहभागी होण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. श्रीपादकांचे दर्शन निर्विघ्नपणे होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. भाविकांना सोबत दिलेल्या QR कोड किंवा लिंकवर स्कॅन करून प्रवेश निश्चित करण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे त्यांना सहजपणे दर्शन घेता येईल.

महोत्सवात संत आणि गुरूंच्या पादुका असणार

ज्ञानेश्वर महाराज

संत मुक्ताई

नामदेव महाराज

संत जनाबाई

नरहरी सोनार

सेना महाराज

सावता माळी

एकनाथ महाराज

तुकाराम महाराज

संत निळोबाराय

श्री महेश्वरनाथ बाबाजी

श्री स्वामी समर्थ

श्री साईबाबा

श्री गजानन महाराज

समर्थ रामदास स्वामी

टेंबे स्वामी महाराज

गोंदवलेकर महाराज

शंकर महाराज

गुळवणी महाराज

सदगुरू गजानन महाराज

श्रीगुरू बालाजी तांबे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियाची धमकी| VIDEO

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT