Ahilyanagar Shocking News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News: ८ वीच्या विद्यार्थ्याचे रॅगिंग, रिंगण करून बेल्ट अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, थरकाप उडवणारा VIDEO

9 th Graders Beat Up Eighth Standard Student in Viral Video: अहिल्यानगरमध्ये आठवीच्या विद्यार्थ्याला वसतीगृहामध्ये रिंगण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

सुशील थोरात, अहिल्यानगर

अहिल्यानगमध्ये आठवीच्या विद्यार्थ्याला रिंगण करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या वसतीगृहामध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेतील नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपने आठवीच्या मुलाला मारहाण केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या जामखेड येथील एका निवासी शाळेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतीगृहातील नववीमध्ये शिकणाऱ्या मुलांनी आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला आहे. जामखेडच्या अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध मुलांच्या निवासी विद्यालयातील हा प्रकार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला रिंगण करून बेल्टने आणि लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. ४ ते ५ मुलं या मुलाला बेदम मारहाण करत आहेत. या मधील काही मुलं शाळेच्या गणवेशात दिसत आहेत. मारहाण करण्यात आलेला मुलगा जोरजोरात रडत आहे तरी देखील त्याला एक तरुण बेल्टच्या सहाय्याने पुन्हा मारहाण करताना दिसतोय. या मुलांनी फक्त एकाच मुलाला नाही तर दोन मुलांना मारल्याचे दिसत आहे. कधी कानाखाली तर कधी खाली बसवून त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

हा रॅगिंगचा प्रकार समोर येताच अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी घडल्याची माहिती उघड झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान याबाबत पोलिसात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT