Buldhana Shocking News  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: बुलडाणा हादरले! आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Buldhana Poisoning Case: बुलडाणाण्यामध्ये अन्नातून विषबाधा झाली. आईसह ४ मुलांना विषबाधा झाली. या घटनेत उपचारादरम्यान ३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तर आई आणि एका मुलीवर उपचार सुरू आहेत.

Priya More

Summary -

  • बुलडाण्यात अन्नातून विषबाधा

  • आईसह ४ मुलांना झाली विषबाधा

  • तीन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

  • आई आणि एका मुलीवर उपचार सुरू

  • पोलिसांकडून तपास सुरू

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यात हृदयद्रावक घटना घडली. आईसह चार मुलाना विषबाधा झाली होती. या घटनेत ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई आणि मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या दोघांवर देखील सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याने तीन लहानग्या बहीण-भावांचा मृत्यू झाला असून आई आणि एका चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४ वर्षे), मशिरा मोहंमद वसीम जमदार (वय ७ वर्षे) आणि फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय ८ वर्षे) या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४ वर्षे) आणि अश्मिरा वसीम जमदार (वय ३ वर्षे) यांच्यावर बुलडाणा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सांगितले की, रविवारीपासूनच या कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास होत होता. सोमवारी सकाळी या सर्वांची प्रकृती अधिक बिघडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अली आणि मशिरा यांचा आधी मृत्यू झाला. आई अफरीन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना फातिमा आणि अश्मिरावर बालरोगतज्ज्ञांकडे उपचार करण्यात येत होते. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास फातिमाचाही मृत्यू झाला.

सध्या अश्मिराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर तिची आई अफरीनवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती देखील स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धाड परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 : कोलकाताचा मुंबईवर ४ गडी राखून विजय, प्लेऑफसाठी केकेआरच्या आशा कायम

Donald Trump Bull: ७०० किलोचा 'ट्रम्प रेडा', नेमका आहे तरी कोण?

राज्यातील पेट्रोल टंचाई जीवावर उठली; पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

डिझेल नाही म्हणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार; CM फडणवीस यांनी दिली माहिती, VIDEO

भारताच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री, २ दिवसांत झाले ५० लाख सदस्य; कोण आहे संस्थापक?

SCROLL FOR NEXT