धक्कादायक : नंदुरबारमध्ये बंद घरातील 80 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी! SaamTvNews
महाराष्ट्र

धक्कादायक : नंदुरबारमध्ये बंद घरातील 80 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी!

तर शहादा शहरातून सराफा दुकानातून चार किलो चांदीच्या भांड्यांची चोरी...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) शहरातील रहिवासी सखाराम गोरख पाटील सेवानिवृत्त यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी 79.5 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह इतर मुद्देमालासह एकूण 20 लाख 34 हजार रुपयांची धाडसी चोरी (Theft) केल्याची घटना घडली आहे.

हे देखील पहा :

सखाराम पाटील यांच्या घरात पुढील काही दिवसात लग्नकार्य असल्यामुळे खरेदीसाठी सुरत (Surat) येथे गेले असता भरदिवसा बंद घराचे कुलूप कडी तोडून चोरट्यांनी (Thieves) मोठा ऐवज लंपास केला आहे. याबाबत सखाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तर दुसरीकडे शहादा (Shahada) शहरातून श्रीकृष्ण ज्वेलर्स सराफा दुकानाचे शटर तोडून चार किलो चांदीच्या भांड्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात दुकान मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहादा पोलीस अधिक तपास करीत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: डिजेविरोधी बापटांचाच डीजेवर डान्स? काय म्हणता, बापट डीजेवर नाचले?

शिंदेसेनेला आणखी एक झटका, शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या अधिकारांवर कात्री

पुण्यात पोलीस भरतीतील घोटाळा उघड, बनावट क्रीडा प्रमाणपत्रांद्वारे नोकरीवर डल्ला

Maharashtra News Live Update: सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त सुरक्षेसह ध्वनी मर्यादा, लेझर लाईटबाबतही घेतला मोठा निर्णय

MPSC पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत? झिरवळांच्या चौकशीची विरोधकांची मागणी

SCROLL FOR NEXT