Nanded News  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: धक्कादायक! नांदेडमध्ये धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्यामुळे एक हजार जणांना विषबाधा

Nanded Food Poisoning: नांदेड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्ल्याने एक हजार भाविकांना विषबाधा झालीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Food Poisoning Nanded News

नांदेड (Nanded) जिल्ह्यांमधून भाविकांना प्रसादातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात चांगलीच खळबळ उडालीय. विषबाधा झाल्याची माहिती मिळताच त्यांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आपण या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या.  (Latest Marathi News)

भगर खाल्याने विषबाधा

एका धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्यामुळे एक हजार जणांना विषबाधा झाली आहे. नांदेड जिल्हयातील लोहा तालु्क्यात ही घटना घडली आहे. लोहा तालुक्यातील कोष्टवाडीमध्ये संत बाळुमामा यांचा पालखी सोहळा (Food Poisoning in Nanded) होता. आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा होता. काल एकादशी असल्यामुळं भाविकांना भगर हा महाप्रसाद देण्यात आला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रुग्णांवर उपचार सुरू

भगर (bhagar) खाल्यामुळे अनेकांना उलटी, मळमळ, चकर येणं असा त्रास सूरु झाला. या कार्यक्रमाला सावरगाव, कोष्टवाडी, हरणवाडी, पेंडु, सादलापुर या गावातील नागरिक आले होते. त्यांना देखील विषबाधा (Nanded News) झाली. मिळेल त्या वाहनांनी बाधितांना रुग्णालयात पाठवण्यात आलं. लोहा येथील सरकारी तसच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रुग्णाची संख्या अधिक असल्यानं नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देखील रुग्णांना दाखल करण्यात आले. रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची (devotees Food Poisoning) प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सर डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी दिली आहे. प्रसादातून विषबाधा झाल्यामुळे भाविकांमध्ये काहीसं घाबरटीचं वातावरण होतं. बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

परभणीमध्ये देखील भाविकांना विषबाधा

परभणी तालुक्यातील माळसोन्नामध्ये देखील भगर खाल्ल्यामुळे चारशे ते पाचशे जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर देखील सोना गावात व परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. बाधित भाविकांवर उपचार सुरू आहेत.

परभणी तालुक्यातील सोना या गावात सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्ताने सकाळी शाबूदाणा उसळ व केळीचा प्रसाद देण्यात आला होता. तर, रात्री भगर व आमटी करण्यात आली होती. भगर व आमटी खाल्यानंतर (Food Poisoning by bhagar) गावकऱ्यांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या. गावकऱ्यांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आरोग्य विभागाला सोबत घेत गावात उपचार सुरू केले. तर काहींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सर्वांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT