परभणी तालुक्यातील सोना गावामध्ये (sona village near parbhani) सप्ताहाच्या कार्यक्रमात भगर व आमटीच्या प्रसादातून जवळपास 400ते 500गावकऱ्यांना विषबाधा झाली. ग्रामस्थांवर सोना गावात व परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. (Maharashtra News)
परभणी तालुक्यातील सोना ह्या गावात सप्ताह सुरू आहे. सकाळी शाबूदाणा उसळ व केळी असा प्रसाद देण्यात आला. रात्री भगर व आमटी करण्यात आली होती. भगर व आमटी खाल्यानंतर गावकऱ्यांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या. (parbhani latest marathi news)
या घटनेची माहिती गावकऱ्यांनी प्रशासनाला दिली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वत: आरोग्य विभागाला सोबत घेत ग्रामस्थांवर गावातच उपचार सुरू केले. याबराेबच आवश्यकतेनूसार काहींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सर्व ग्रामस्थांची प्रकृती स्थिर आहे. ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.