Crime News Saam tv
महाराष्ट्र

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sangli News: सांगलीमध्ये शेतकरी पिता-पुत्रांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शेतामध्ये जाऊन दोघांनी किटकनाशक पिऊन आत्महत्या केली. यामुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण समोर आलं नाही.

Priya More

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये शेतकरी पिता-पुत्रांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी गावामध्ये ही घटना घडली. सोनी-भोसे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये जाऊन एका शेतकरी पिता-पुत्राने आपली जीवन यात्रा संपली. गणेश हिंदुराव कांबळे (वय ५२ वर्षे) आणि इंद्रजित गणेश कांबळे (वय २३ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या पिता-पुत्राचे नावं आहेत. या घटनेमुळे सोनी गावात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील सोनी गावामध्ये राहणारे गणेश कांबळे हे आज पहाटे गावाजवळच सोनी- भोसे रस्त्यावर असलेल्या शेतामध्ये गेले होते. यावेळी त्यांनी कीटक नाशक पिऊन आत्महत्या केली. काही शेतकऱ्यांनी त्यांना शेतामध्ये पडल्याचे पहिल्यानंतर तात्काळ गणेश कांबळे यांचा मुलगा इंद्रजित आणि त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिका घेऊन इंद्रजित आणि त्याचे नातेवाईक घटनास्थळी आले.

सगळे शेतकरी गणेश कांबळे यांना उचलून रुग्णवाहिकेमध्ये ठेवत होते. त्याचवेळी त्यांचा मुलगा इंद्रजितने देखील मागे जाऊन किटकनाशक प्राशन केले. नातेवाईकांनी या पिता-पुत्रांना एकाच रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. पण दोघांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे सोनी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा, मिरज ग्रामीण पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. इंद्रजीत कांबळेचे मागच्या महिन्यात लग्न झाले होते. नवविवाहित तरुणाने आणि त्याच्या बापाने टोकाचे पाऊल का उचलले? याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT