रत्नागिरीमध्ये २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीाहे. लांजा तालुक्यात मठ गावातील मठकरवाडीत ही घटना घडली. या तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. भूषण राजेश मठकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. भूषण हा रात्री ८ वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडला पण तो परत आलाच नाही. गणपतीची हातगाडी ही वरच्या घरी ठेवून येतो असे सांगून तो घरातून बाहेर पडला. पण बराच वेळ झाला तरी सुद्धा चो घरी परत आला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा मोबाईल बंद लागत होता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरच्यांनी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्याचा फोन बंद लागत होता.
त्यानंतर भूषणच्या घरच्यांनी आणि ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी ११.१५ वाजताच्या सुमारास भवानी सोमेश्वरचे पुजारी यांनी भूषण मंदीराच्या शेजारी असणाऱ्या तळीच्या जवळील आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत लटकत असलेला दिसत असल्याचे सांगितले. हे ऐकून भूषणच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सकरली. सगळ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर त्यांना धक्का बसला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भूषणचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
भूषणने बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. पाली येथील महाविद्यालयातून त्याने शिक्षण पूर्ण केले होते. त्याने काही दिवस एका हॉटेलचं कामही केलं होतं. पण गेल्या काही दिवसांपासून तो घरीच होता. मात्र त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली यामागचे कारण समोर आले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भूषणच्या आत्महत्येने शेतकरी असलेल्या मठकर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. भूषण याच्या पश्चात आई-वडील लहान बहीण असं कुटुंब आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.