Nagpur 12 Year Old Boy Abusing News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : नागपूरमध्ये आई वडिलांचा क्रूरतेचा कळस, १२ वर्षाच्या लेकाला साखळीने बांधलं, घरातच डांबून ठेवलं; नेमकं काय प्रकरण?

Nagpur 12 Year Old Boy Abusing News : नागपुरात १२ वर्षांच्या मुलाला जनदात्यांनी तब्बल ३–४ महिने साखळीने बांधून ठेवले. या क्रूर प्रकारामुळे मुलाच्या हात-पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत.

Alisha Khedekar

  • नागपुरात १२ वर्षांच्या मुलाला ३–४ महिने साखळीने बांधून ठेवण्याचा अमानवीय प्रकार

  • मुलाच्या हात-पायांना गंभीर, खोल जखमा

  • १०९८ हेल्पलाइन तक्रारीनंतर बाल संरक्षण पथकाने मुलाची सुटका केली

  • मुलाला सुरक्षित बालगृहात हलवले; वैद्यकीय उपचार सुरू

  • पालकांविरुद्ध गुन्हा दाखल, कठोर शिक्षेची मागणी जोरात

आई वडील मुलांचे जेवढे लाड करतात तितकेच ते शिस्त देखील लावतात. मात्र या एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचा चुकीचा परिणाम भोगावा लागतो. नागपुरातील एका जोडप्याने त्यांच्या मुलाला शिस्त लावण्यासाठी हृदय पिळवटून टाकणारी कृती केली आहे. १२ वर्षांचा मुलगा सतत चुकीचे वर्तन करतो म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला साखळीने बांधून ठेवले. हा प्रकार गेले ३-४ महिने सातत्याने सुरु असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात राहणाऱ्या एका जोडप्याला १२ वर्षांचा मुलगा आहे. हा मुलगा मस्ती करायचा आणि नेहमी चुकीचे वर्तन करत असल्याचे त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आले. त्यामुळे या मुलाचे आई वडील रोजंदारीवर जाताना मुलाला क्रूरतेने साखळी कुलुपाने घरात डांबून ठेवायचे. संध्याकाळी घरी परतल्यानंतरच त्याला मोकळे सोडले जाई. हा अमानवीय प्रकार गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू होता. या क्रूर कृत्यामुळे मुलाच्या हात-पायांना गंभीर आणि खोल जखमा झाल्या आहेत.

या घटनेची माहिती चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर बाल संरक्षण पथकाला देण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे बाल संरक्षण पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलाची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि नंतर त्याला सुरक्षित बालगृहात हलवण्यात आले. मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी त्याचे समुपदेशनही सुरू करण्यात आले आहे.

या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात मुलाच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल न्याय अधिनियम २०१५ च्या तरतुदींनुसार त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दोषी पालकांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वसई–विरार पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात ५४७ उमेदवार

Municipal Election : बिनविरोध निवडणुकांची चौकशी होणार; निवडणूक आयोगानं काय आदेश दिले?

Kolhapur–Vaibhavwadi Railway : कोल्हापूर-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गामुळे होणार कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा विकास

नव्या वर्षात पोलीस दलात मोठा फेरबदल; 50 IPS अधिकाऱ्यांना प्रमोशन, कुणाची कुठे नियुक्ती होणार?

Lonavala Tourism : लोणावळ्याजवळ वसलंय 'हे' प्राचीन शिल्पकलेचा अद्भुत वारसा जपणारे ठिकाण

SCROLL FOR NEXT