Jalgaon  Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon : मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न, जळगावात खळबळ

Jalgaon Police: जळगावमध्ये एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जळगावच्या आकाशवाणी चौकात ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

Priya More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. जळगवाच्या आकाशवाणी चौक परिसरात ही घटना घडली. मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच ही व्यक्ती समोर आली आणि त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीची रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळाल. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जळगाव शहरामध्ये दाखल होताच या ताफ्यामध्ये घुसून एखा व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात ही घटना घडली. संजय वराडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. संजय यांनी अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला.

शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने संजय वराडे या ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी संजय यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यामुळे शहरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

SCROLL FOR NEXT