Washim Crime news Saam Tv News
महाराष्ट्र

५१ वर्षीय नराधमाची मुलीच्या मैत्रिणींवर वाईट नजर; ३ मुलींच्या अंगावरून हात फिरवला अन्...जाब विचारताच नातेवाईकावर हल्ला

Shocking Incident in Washim Crime: ५१ वर्षीय व्यक्तीची ३ अल्वयीन मुलींसोबत अश्लील छेडछाड. जाब विचारताच नातेवाईकावर जीवघेणा हल्ला.

Bhagyashree Kamble

वाशिमच्या मालेगावातून एक संतप्त घटना उघडकीस आली आहे. ५१ वर्षीय व्यक्तीने तीन मुलींसोबत अश्लील चाळे करून छेडलंय. तसेच त्यांच्या अंगावर हात फिरवला. या घटनेनंतर मुलींनी आपल्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवर आरोपीने जीव घेणा हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुणरत्न अरविंद पखाले असं आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी आरोपीची अकरा वर्षांची मुलगी आणि तिच्या तीन मैत्रिणी या घराच्या समोर खेळत होत्या. तेव्हा आरोपी गुणरत्न अरविंद पखाले तेथे आला. तसेच मुलींना घराचे छतावर खेळण्यासाठी बोलावले. त्यावेळेस त्याची मुलगी खाली गेली आणि इतर मुली छतावर खेळण्यासाठी गेल्या.

त्यावेळेस गुणरत्न देखील घराच्या छतावर गेल्या. तिन्ही मुलींना वाईट नजरेनं पाहिलं. तसेच मुलींच्या अंगावरून हात फिरवून अश्लील चाळे आणि छेडछाड केली. तेव्हा त्या मुली त्या ठिकाणाहून पळून गेल्या. तसेच घरी जाऊन त्यांनी त्यांच्या आईला या घटनेबाबत माहिती दिली. याची माहिती मिळताच तिन्ही मुलींच्या कुटुंबाला धक्का बसला.

दरम्यान, तिन्ही मुलींच्या आई वडिलांनी सायंकाळ ७च्या सुमारास आरोपीचे घर गाठले. तसेच या घटनेबाबत जाब विचारला. आरोपीनं धारदार शस्त्राने तक्रारदाराच्या भाच्याच्या अंगावर वार केले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून, तेथून वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले. वाशिम येथे जखमीच्या छातीला ६ टाके लागले. या घटनेनंतर मुलींच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच गुणरत्न पखाले याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार, आरोपीविरोधात कलम ११८ (१), ३५२, ७४ बीएन एस तसेच सहकलम ८ पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला १२ डिसेंबर रोजी कोर्टासमोर हजर केले असता, कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडी अंतर्गत वाशिम कारागृहात रवानगी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Bag Policy: शाळेच्या दप्तराचे वजन किती असावे? सरकारने दिले स्पष्ट आदेश

पंतप्रधान मोदींमुळे मुघलांचा इतिहास कमी झाला: CM फडणवीस

पीएम आवास योजनेच्या इमारतीचं गेट कोसळलं अन्... निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ|VIDEO

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार, बडा नेता माजी नगरसेवकांसोबत शिंदे गटात प्रवेश करणार?

Alibaug Travel : निसर्गप्रेमींसाठी नंदनवन! अलिबागमधील 'या' ठिकाणाची करा सफर, ख्रिसमस होईल खास

SCROLL FOR NEXT