Crime
Crime Saam TV
महाराष्ट्र

Beed: मैत्रिणीच्या घरी अभ्यासाला गेली; वडिलांनी केलं भयंकर कृत्य

विनोद जिरे

बीड - मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा, तिच्या मैत्रिणीच्या वडिलांनीचं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या घटनेचा मनावर परिणाम झालेल्या पीडीतेने, झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. ही धक्कादायक आणि अतिशय किळसवाणी घटना शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या, बीडच्या (Beed) अंबाजोगाई (Ambajogai) शहरात घडली आहे. (Beed Latest News)

याविषयी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी दीपक शरणाप्पा बाबजे रा.अंबिका सोसायटी अंबाजोगाई यांची मुलगी ही पिडीत मुलीची मैत्रीण आहे. 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास अल्पवयीन पिडीता मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली. यावेळी आजूबाजूला कोणी नसल्याचं लक्षात येताच, आरोपी दीपक बाबजे यांने मुलीच्या मैत्रिणीचाच विनयभंग केला.

यादरम्यान पीडिता जोरात ओरडल्यामुळे, दीपक बाबजे हा बाजूला सरकला व ओरडण्याचा आवाज ऐकून दीपक बाबजे ची मुलगी धावत आली. या घटनेनंतर घाबरलेली पिडीता तेथून आपल्या घरी आली. मात्र भीतीपोटी घडलेला प्रकार पीडितेने कोणाला सांगितलं नाही. दरम्यान या घटनेचा पीडीतेच्या मनावर परिणाम झाला आणि तिने 24 सप्टेंबर रोजी झोपेच्या गोळ्या खात आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येतात तिच्या आईने तिला उपचारासाठी, अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले‌.

यावेळी उपचार घेतल्यानंतर पीडित मुलगी 30 सप्टेंबर रोजी शुद्धीत असून घडलेल्या प्रकाराबाबत आईने विश्वासात घेतल्यानंतर मुलीने सर्व हकीगत सांगितली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आरोपी,दीपक शरणाप्पा बाबजे याच्या विरोधात पाॅक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

Eknath Shinde News| एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या बंद दाराआड चर्चा!

Today's Marathi News Live: या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

SCROLL FOR NEXT