Chhatrapati Sambhajinagar News Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar News: विकृतीचा कळस! माथेफिरू तरुणाकडून कुत्र्याची चाकूने भोसकून हत्या; संतापजनक घटनेचा VIDEO व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar News Update: निष्पाप मुक्या प्राण्याचा विनाकारण जीव घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केली जात आहे.

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar News: माथेफिरु तरुणाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कुत्र्याची चाकूने हत्या केल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. या घटनेने प्राणीमित्रांनी संताप व्यक्त केला असून तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा परिसरात रस्त्याच्याकडेला शांतपणे उभा असलेल्या एका श्वानाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल झाला आहे. हा संतापजनक प्रकार मंगळवारी रात्री घडल्याची माहिती आहे. अत्यंत निर्घृणपणे माथेफिरू श्वानाची हत्या करत असल्याचा व्हिडिओ व्ह्याराल झाला आहे.

दुसऱ्या दिवशी श्वान रस्त्याच्या कडेस मृत आढळून आल्याने पेट लव्हर्समधून संताप व्यक्त करण्यात आला. निष्पाप मुक्या प्राण्याचा विनाकारण जीव घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केली जात आहे. तसेच या माथेफिरू युवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उस्मानपुरा भागातील प्राणीमित्रांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ फरार घोषित

Goa-New Year Trip : संस्कृती, इतिहास अन् निसर्गाचा अनोखा संगम, 'हे' आहे गोव्यातील सर्वात सुंदर ठिकाण

Sukhi Bhel: कुरमुऱ्यांची सुकी भेळ कशी बनवायची?

Ind vs SA 2nd T20 Live : पहिल्या पराभवानं हादरली दक्षिण आफ्रिका टीम; दुसऱ्या टी २० साठी प्लेइंग ११ मध्ये ३ बदल

मुंबई-ठाण्यात युती, पुण्यात 'एकला चलो रे'? आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला|VIDEO

SCROLL FOR NEXT