Crime News  saam tv
महाराष्ट्र

Crime News : यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला अन् थेट 3 घरं फोडली! चोराची आयडिया ऐकून पोलीसही चक्रावले

YouTube Misuse Exposed: यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरफोडीचा प्लॅन आखणाऱ्या हिंगोलीच्या अजय भुक्तरला अहिल्यानगर पोलिसांनी अटक केली.

Sakshi Sunil Jadhav

आज काल युट्यूबचा वापर फक्त मनोरंजनासाठी लोक करत नाहीत. त्यातून विविध कला लोकांपर्यंत पोहोचवतात किंवा काही कला आत्मसादही करता येतात. पण युट्यूबचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्याचंही प्रमाण वाढलं आहे. एका व्यक्तीने युट्यूबचा वापर करून चक्क घरफोडीचा प्लॅन आखला. तो थेट हिंगोलीहून अहिल्यानगरला आला. दिवसभर रेकी करून स्थानिक दुकानातून स्क्रू ड्रायव्हर खरेदी केला.

त्यानंतर एक-दोन नाही तर तब्बल तीन घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केला. पण पोलिसांनी या आरोपीला बेज्या ठोकल्या आहेत. अजय भुक्तर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, त्याची चोरी करण्याची पद्धत ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.

तरुणपणी कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरफोडीचा मार्ग निवडणाऱ्या या तरुणाला अहिल्यानगर पोलिसांनी अटक केली. हिंगोली येथून थेट अहिल्यानगरमध्ये येऊन एक-दोन नाही, तर तब्बल तीन घरफोड्या करून चार लाखांच्या आसपास सोनं आणि रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या अजय भुक्तर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची घरफोडी करण्याची पद्धत समोर आल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

आरोपी अजय भुक्तर याने घरफोडी करण्याआधी संबंधित परिसराची दिवसभर रेकी करण्याची पद्धत अवलंबली होती. कोणत्या घरात चोरी करायची, त्या परिसरात वर्दळ किती आहे, घर बंद आहे का, याची माहिती तो आधी घेतली होती. विशेष म्हणजे, घरफोडीसाठी लागणारे स्क्रू ड्रायव्हर आणि इतर साहित्यही तो त्याच परिसरातील स्थानिक दुकानातून खरेदी करत होता. त्यानंतर संधी साधून घरफोडी करायची आणि चोरी करून घटनास्थळावरून पसार व्हायचं, असा त्याचा फंडा होता.

कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्याच्या आकर्षणातून यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून त्याने घरफोडीचे नियोजन केल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोलीहून अहिल्यानगरमध्ये येऊन तीन ठिकाणी घरफोड्या केल्यानंतर तो पसार झाला होता. मात्र, अहिल्यानगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्याचा माग काढला आणि अखेर त्याला अटक केली.या प्रकरणाची माहिती शहराचे पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विक्रोळीत संतापजनक प्रकार! घरात घुसून १३ वर्षीय मुलीची छेडछाड

28 षटकार, 7 चौकार, बेबी बॉसचं अवघ्या 52 चेंडूत द्विशतक; रोहित, गिलला जे जमलं नाही ते वैभवनं केलं!

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अजय बारस्कररांनी पोलिसांना सोपवला जरांगेंच्या विरोधातील पुराव्याचा पेनड्राईव्ह

Remove Tea Stains: कपड्यांवर चहा-कॉफीचे डाग पडले? डाग घालवण्यासाठी वापरा 'ही' सोपी घरगुती ट्रिक

सुप्रिया सुळेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद, दुसऱ्या खासदाराला राज्यमंत्रीपद; शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याचा प्रस्ताव, घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT