Union Minister’s Car Crashes into Truck Saam Tv
महाराष्ट्र

Accident: समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा

Union Minister’s Car Crashes into Truck: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला वाशिमध्ये भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारने ट्रकला धडक दिली. या अपघातामध्ये तिघे गंभीर जखमी झाले.

Priya More

Summary -

  • समृद्धी महामार्गावर केंद्रीय मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात

  • मंत्र्यांच्या कारने ट्रकला जोरदार धडक दिली

  • अपघातामध्ये मंत्र्यांच्या कारचा चक्काचूर

  • मंत्री कारमध्ये नसल्याने मोठी दुर्घटना टळली

  • अपघातामध्ये कारमधील तिघे गंभीर जखमी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगावनजीक ही घटना घडली. कारने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात झाला तेव्हा मंत्री कारमध्ये नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर सोडल्यानंतर त्याचे अंगरक्षक, सहकारी आणि कारचालक हे मेहकरच्या दिशेने जात होते. याचदरम्यान मध्यरात्री समृद्धी महामार्गावर त्याच्या कारला भयंकर अपघात झाला. कारने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये प्रतापराव जाधव यांचे अंगरक्षक, त्यांचे सहकारी आणि कारचालक हे तिघे जण गंभीर जखमी झाले.

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघांना पोलिसांनी तात्काळ वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. मंत्री प्रतापराव जाधव यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी दिल्ली दौरा रद्द केला. ते मुंबईवरून मेहेकरला परत आले. त्यांनी जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात समृद्धी महामार्गावर माळेगावजवळ झाला. मंत्री प्रतापराव जाधव यांची कार नागपुरवरून मेहेकरच्या दिशेने जात होती. तर मुंबईवरून एक मिनी ट्रक नागपुरकडे जात होता. या ट्रकने महामार्गावर अचानक युटर्न घेतला त्यामुळेे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि या कारने थेट ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही मात्र कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघातात कारचा चुराडा झाला. पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaye Khanna: 'सनकी, सर्वांचा अपमान करतो...'; 'या' दिग्दर्शकाने अक्षय खन्नावर केले गंभीर आरोप, म्हणाला...

Maharashtra Live News Update: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का, राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश

Full Sleeves Blouse Design : फुल स्लीव्ह ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाइन्स, दिसाल एकदम स्टायलिश अन् सुंदर

Girija Oak: असं सौंदर्य पाहिलं अन् मन उडू उडू झालं...

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, जागा वाटपावरही झाला निर्णय; अजित पवार काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT