Beed : धक्कादायक! परळीतून १४० गाढव चोरीला SaamTvNews
महाराष्ट्र

Beed : धक्कादायक! परळीतून १४० गाढव चोरीला

गांजाच्या सामूहिक शेतीवरून गाजत असणाऱ्या प्रकरणानंतर परळीत आता गाढवांची चोरी..!

विनोद जिरे

बीड :- चोरटे कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. मौल्यवान वस्तू, ऐवज, पैसे, वाहने यांच्या चोरीची प्रकरणे आपण बातम्यातून वाचतो, ऐकतो अथवा पाहतो. मात्र, आता नवीन चोरीचा प्रकार समोर आला आहे. गांजाच्या सामूहिक शेतीवरून गाजत असणाऱ्या परळीत आता गाढवं चोरी झाल्याचा प्रकार समोर आलाय.

हे देखील पहा :

याविषयी परळी शहर पोलीस ठाण्यांमध्ये आणि संभाजीनगर पोलीस ठाण्यात जवळपास 140 गाढव चोरी गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर गाढव चोरी गेल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या भोई, वडार आणि बेलदार समाजातील जवळपास 40 ते 50 कुटुंबापुढं आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

या प्रकारामुळे गांजा नंतर आता गाढवाची चर्चा परळीत रंगली आहे. तर याविषयी आता मी रस्त्यावर उतरणार असल्याचे चंद्रकांत देवकते यांनी सांगितले. तर याविषयीची तक्रार आली असून पोलिस कारवाई करत आहेत अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

SCROLL FOR NEXT