Gondia shivshahi bus Accident Gondia shivshahi bus Accident
महाराष्ट्र

Gondia Accident : गोंदियात भीषण अपघात; शिवशाही बस उलटून १० जणांचा मृत्यू, ३०-३५ प्रवासी जखमी

Gondia Shivshahi Bus Accident : गोंदियात शिवशाही बस उलटली, ८ जणांचा मृत्यू, 35 लोक जखमी

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Gondia shivshahi bus Accident News : गोदिंयातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अर्जुन येथे शिवशाही बस उलटली. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी ते गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात झाला. शिवशाही बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झालाय. 30 ते 35 लोक जखमी असल्याची माहिती माहिती मिळाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. काही जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातातील मृताचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

आज दुपारी १२ ते साडेबारा वाजेच्या दरम्यान शिवशाही (बस क्रमांक एमएच ०९/ईएम १२७३) बसचा अपघात झाला. दुचाकी अचानक समोर आली. दुचाकी चालकाला वाचविण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये शिवशाही बसवरील चालकाचा ताबा सुटला, अन् बस उलटली.

दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसला भीषण अपघात झाला, या अपघातात महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) शिवशाही बस उलटल्याने १० प्रवाशांचा मृत्यू झालाय. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार झालाय. प्रवाशांच्या माहितीवरून रुग्णवाहिका विभाग आणि पोलीस विभागाने घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत. गोंदियातील एसटी अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झालाय. ३०-३५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृताची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी अपघातसंदर्भात स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करुन परिस्थितीची माहिती घेतली. जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT