नागपूर: नागपूर महानगरपालिका निवडणूकीत शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिलाय. आधी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेनं सुद्धा स्वबळाची तयारी सुरू केलीय. शिवसेना स्वबळावर लढली तर २५ नगरसेवक निवडून आणू आणि नागपूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेत शिवसेनेची महत्वाची भुमिका असेल” असं मत शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी व्यक्त केलंय. (Shivsena Will Fight its Own in Nagpur Municipal Election 2022)
हे देखील पहा -
खासदार संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्यानंतर उपराजधानीत शिवसेनेत काही बदल करण्यात आलेय. किशोर कुमेरीया यांची जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. आता नागपूरात दोन जिल्हाप्रमुख झाले आहेत. जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मनपा निवडणूक लढणार, असं किशोर कुमेरीया यांनी सांगीतलंय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना वेगळं लढल्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.