मुंबई : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा चांगलाच वादळी ठरला. आता आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होणार असून शिंदे-फडणवीस सरकारला (Eknath Shinde) कोंडित पकडण्यासाठी ठाकरे गटाने नवीन रणनिती तयार केली आहे. उद्धव ठाकरे आपल्या प्रमुख नेत्यांसह आज नागपुरात दाखल होणार आहे. दरम्यान, आज संजय राऊत कोणता राजकीय बॉम्ब फोडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)
दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत, मिलिंद नार्वेकर नागपुरात येणार आहेत. यामुळं अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.
'उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॉम्ब फोडणार'
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला होता. 'तुमच्या फायली तयार असून उद्या मोठा बॉम्ब फोडणार' असे सुतोवाच राऊत यांनी केले होते. त्याचबरोबर 'आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आमची सेना लेचापेचा, पळपुट्यांची नाही. धमक्या द्या , तडीपारी करा तरीही आमची सेना बुलंद आहे. फेब्रुवारीपर्यंत काहीही करून घ्या. नंतर तुम्ही नसणार, असा इशाराही संजय राऊतांनी शिंदे गटाला दिला होता. (Maharashtra Political News)
इतकंच नाही तर, 40 आमदार गेले असले तरी आता 140 आमदार निवडून आणून आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे. ज्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना सोडायचे नाही.अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून तुमची झोप उडवणार. तुमचे शंभर बाप आले तरी तुम्हाला सोडणार नाही. ज्या कोठडीत मी होतो. त्यात तुम्हाला टाकणार. तुमच्या फायली तयार आहेत. आमचे सरकार आल्यावर तुम्हाला दया मया नाही, तुम्ही मागून खंजीर खुपसला, आम्ही पुढून खुपसू, असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.