Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार?; कोर्टाने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात सुनावत नोटीस पाठवली आहे
Abdul Sattar
Abdul Sattar Saam TV
Published On

Abdul Sattar Latest News : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर NIT भूखंड घोटाळ्याचे आरोप होत असताना, आता दुसरीकडे त्यांच्या सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात सुनावत नोटीस पाठवली आहे. (Latest Marathi News)

Abdul Sattar
Aaditya Thackeray : दिशा सालियान प्रकरणात आरोप झाल्यानंतर आदित्य ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

काय आहे प्रकरण?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री होते. यावेळी त्यांनी वाशिम येथील 37.19 एकर गायरान जमिनीचे अवैध वाटप केल्याचा दावा हायकोर्टात करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते श्याम देवळे व संतोष पोफळे यांनी याबाबतची जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली होती. (Maharashtra Political News)

अब्दुल सत्तार यांनी सत्तांतराच्या अगोदर म्हणजे शिवसेनेतल्या फुटीच्या तोंडावर 17 जून 2022 रोजी ३७ एकर गायरान जमीन योगेश खंडारे नामक व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना कोणत्याही कायदेशीर बाबींचे पालन केले गेले नाही असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

Abdul Sattar
Kalicharan Maharaj : 'पुढच्या १० वर्षात देशात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल'; कालीचरण महाराज असे का म्हणाले?

दरम्यान, नागपूर खंडपीठात या प्रकरणात सुनावणी झाली. यावर हायकोर्टाने अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर कडक शब्दात ताशेते ओढलेत. अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहीत असूनही सत्तारांनी हा निर्णय घेतलाय. जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारच्या जीआरची ही सत्तारांच्या निर्णयामुळे या पायमल्ली झाली आहे, असं म्हणत कोर्टाने सत्तार यांना नोटीस धाडली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com