Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray on BJP : ही लोकं कलंकच आहेत, भाजपकडून सुरु असलेल्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

Political News : एखादा माणूस भ्रष्ट आहे, तुमचं कुटुंब भ्रष्ट आहे. तो तुम्ही एखाद्यावर कलंक लावत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून राज्यभर निषेध केला जात आहे. नागपूरसह अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलन करत आहेत.

यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, कलंक बोललो त्यात एवढं लागण्यासारखं काय आहे. ज्यांना हा शब्द लागला असेल, ते एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना तेव्हा तो व्यक्ती भ्रष्ट आहे हा त्याच्यावर कलंक नाही लावत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

माझ्या तब्येतीवर हे बोलले. माझ्या ऑपरेशनवर खिल्ली उडवली. माझ्या मानेच्या पट्ट्यावर ते गेले. मी जे भोगले त्यांना भोगावे लागून नये. पण त्यांना जेव्हा भोगावं लागेल तेव्हा त्यांना हा त्रास कळेल. पण तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाता. मला जे बोलता ते चालतं का? कुणाच्या तब्येतीवर, कुटुंबावर बोलता. त्यामुळं माझं म्हणणं आहे ही लोकं कलंक आहेतच. महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही लोकं कलंक आहेत, असं उद्धव ठाकरे  यांनी म्हटलं.

एखादा माणूस भ्रष्ट आहे, तुमचं कुटुंब भ्रष्ट आहे. तो तुम्ही एखाद्यावर कलंक लावत नाही का. मी भाषणातून हे बोललो. हसन मुश्रीफ यांच्य पत्नीने म्हटलं होतं की आमच्यावर अशा वारंवार धाडी टाकण्यापेक्षा एकदाच गोळ्या घालून आम्हाला ठार मारा. मात्र तेच हसन मुश्रीफ आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, याला काय म्हणायचं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

तुम्ही म्हणाल तो माणून भ्रष्ट, आणि त्याच व्यक्तील तुम्ही मंत्रिमंडळात घेता. त्या कुटुंबाने समाजात वावरायचं कसं? मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का? मग तुम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप का लावले. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करताना याचं भान ठेवा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. (Political News)

घराघरात तुम्ही ईडी, सीबीआय घुसवता मग ते कुटुंब कलंकित होत नाही का. आम्ही तुम्हाला काही बोललो किंवा नुसती जाणीव करुन दिली तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाण्याचं कारण काय? त्यामुळे तुमच्याकडील आरोप पहिले थांबवा. तुम्ही सत्तेचा गैरवापर करुन त्रास देता. त्यानंतर त्यांना तुम्ही मानाचं पान वाटता, ही कुठली संस्कृती आहे? अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan: आमिर खानकडून चाहत्यांना गिफ्ट, फक्त १०० रुपयांत पाहायला मिळणार सर्व चित्रपट; कुठे आणि कसं?

Smartphone Tips: फोन सतत हॅंग होतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

Shocking : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, Video मुळे सरकारी रुग्णालयातलं सत्य बाहेर

Chai Masala Powder : चहाचा स्पेशल मसाला घरी कसा बनवायचा?

Devendra Fadnavis: आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही; CM फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम|VIDEO

SCROLL FOR NEXT