Rahul Shewale and Sanjay Raut  Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'पब्लिक सब जानती है'; खासदार शेवाळे यांच्या आरोपांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

राहुल शेवाळे यांच्या आरोपाला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Sanjay Raut News : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्यानंतर त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. यावेळी राहुल शेवाळे यांनी आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले. राहुल शेवाळे यांच्या आरोपाला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'पब्लिक सब जानती है, असं उत्तर संजय राऊत यांनी खासदार शेवाळे यांच्या आरोपाला दिलं आहे. (Latest Marathi News)

शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त नवी मुंबई हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, 'शिवसेना एकच आणि ती संपूर्ण शिवसेन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करते. मी शाखेच्या उद्घाटनासाठी आलोय आणि बाहेर वातावरण शिवसेनामय आहे'.

तर यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. 'शिवसेना सोडून दोन-चार दलाल गेले असतील. पळपुटे गेले आणि उद्या जर आमचं सरकार आलं तर, ते परत इकडेच असणार, असा दावा राऊत यांनी केला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमवादावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'गेली ७० वर्षे बेळगावच्या प्रश्नावर लढतोय. शिवसेना गेली पंचावन्न वर्षे बेळगावच्या प्रश्नावर लढा देत आहे. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, ज्याने बेळगाव प्रश्नासाठी स्वतःचे ६९ हुतात्मे दिले. बाळासाहेबांनी याच प्रश्नासाठी तुरुंगवास भोगला. आमचं बेळगावशी भावनिक नातं आहे, असे राऊत म्हणाले.

सरकारने शेपूट घातला असेल तरी शिवसेना शेपूट घालणार नाही. बेळगावच्या जनतेने कधीही हाक मारावी, आम्ही सगळी बंधने तोडून तिकडे पोहचू, बघुयात कोण अडवत, असा सवाल करत राज्य सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, संजय राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी कथित महिला लैंगिक शोषणाच्या आरोपावरून शिवसेनेवर गंभीर आरोप केले. त्यांना प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, 'कोणाच्या आरोपांबाबत बोलताय, तुम्ही त्याने आरोप केले आणि तुम्ही ते गांभीर्याने घेत आहे. पब्लिक सब जानती है,'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT