sushma andhare  saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare: महाराज माफ करा! 'गद्दार ताठ मानेने फिरतोय...' सुषमा अंधारेंचे भावनिक पत्र

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंंधारे यांचे भावनिक पत्र सध्या व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Shivjayanti 2023: शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा निकाल लागल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निकाल जाहीर केला. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या निकालावर ठाकरे गटांच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. ज्यामधून त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. (Shivsena)

आज १९ फेब्रूवारी, देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोशात साजरी केली जात आहे. याच निमित्ताने ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंंधारे यांचे भावनिक पत्र सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला माफ करा, असे म्हणत राज्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे.

काय आहे सुषमा अंधारेंचे पत्र..

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला माफ करा..

आज तुमच्या जन्मदिनी, स्वतःला मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाद्याचं कातडं पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय, तुमच्या हयातीत गद्दार ताठ मानेने फिरतोय, असे कधीही घडले नाही, पण ह्यापुढे पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही, असे वचन आम्ही तुम्हाला देतो..

तसेच या पत्रात त्या पुढे म्हणतात की, "शिवश्रध्दा आणि शिवनिष्ठा मनी आहेच, फक्त ह्या गनिमांशी लढण्याचे बळ द्या! स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याची ऊर्जा द्या! आणि ह्या अधर्मयुध्दात विजयी होण्याचा आशीर्वाद द्या! हर हर महादेव !! तुमचा खरा मावळा,सच्चा शिवसैनिक..."

दरम्यान, सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर अनेक शिवसैनिकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत... (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT