Maharashtra Politics: मराठवाड्यात होत असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीचं बीडमधून ठाकरे गटाला धक्का मिळाला असून गळती सुरू झाली आहे. तर मुंबईच्या चेंबूरमधील माजी आमदार तुकाराम काते यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देताना पक्षप्रमुखावर आरोपही केले आहेत. (Latest Marathi News)
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार तुकाराम काते तसेच मुंबईतील ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व नगरसेविका यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
तर बीडमध्येही उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेत शाखाप्रमुख पासून ते आता जिल्हा संघटक पदापर्यंत निष्ठेने काम करणाऱ्या बप्पासाहेब घुगे यांनी ठाकरे गटाला सोडचिट्टी दिली आहे. त्यांनी बीड शहरात बॅनरबाजी करत राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश करत असल्याचं सांगितले आहे.
पक्षाला सोडचिट्ठी देताना तुकाराम काते म्हणाले, 'खरं म्हणजे आज माझा पक्ष प्रवेश झाला आहे. माझी चेंबूर मध्ये शाळा आहे. जी पडायला आली आहे. त्या शाळेत चार हजार विद्यार्थी आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी या शाळेचं काम करणार हे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.
'चेंबूरमधील पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवणार आहेत. मिलिंद नार्वेकर यांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरुन मेट्रो जात आहे. मला उद्धव ठाकरे यांना भेटुदे, तेव्हा मला ते बोलले की तुम्ही कोविड टेस्ट करुन या. मी सर्व केले पण मला काय भेट मिळाली नाही हा महाराजांचा अपमान आहे. या शिवसेनेत मी आधीसारखं काम करेल, असे ते पुढे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, 'निवडणुका आल्या की मुंबई आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जातेय अशा अफवा पसरवल्या जातात. आता आम्ही मुंबईबाहेर गेलेल्यांना मुंबईत आणणार आहोत'.
'विकास कामे आम्ही करतोय. तुम्ही काँग्रेस पक्षाचा अनुभव घेतला, आता शिवसेनेचा पण अनुभव घ्या. इकडे जात वैगरे काही नाही. आता एक कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला आहे म्हणून मला त्यांचे दु:ख माहीत आहे. तुमची सर्व काम होतील. तुमची काम जनतेची आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.