नितेश राणे नॉट रिचेबल - सूत्र Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane | संतोष परब हल्ला प्रकरण, नितेश राणे नॉट रिचेबल - सूत्र

शिवसेनेचे संतोष परब हल्ला प्रकरण भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे संतोष परब हल्ला प्रकरण भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी नितेश राणे यांचे सहकारी सचिन सातपुते यांना अटक झाल्यानंतर आमदार नितेश राणे हे सध्या नॉट रिचेबल आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. (Shivsena Subhash Parab Attack Case BJP MLA Nitesh Rane is not reachable)

सचिन सातपुते यांना अटक झाल्यानंतर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि त्यांचे पीए अज्ञात वसात आहेत. रविवारी (26 डिसेंबर) रात्रीपासून त्यांचे फोन स्विच ऑफ येत आहेत. तसेच, ते आज दिवसभरही कुठेही दिसून आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सध्या नितेश राणे कुठे आहेत, याबाबत सध्या काहीही माहिती नाही.

हेही वाचा -

नेमकं प्रकरण काय?

सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता. तो नितेश राणे यांच्या कार्यकर्त्याने केला होता. त्या संदर्भात कणकवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक 30 डिसेंबरला पार पडणार आहे.

याप्रकरणी कणकवली (Kankavli) पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दोन वेळा हजेरी लावली लावली होती. दोन दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे आणि त्यांचे सहकारी संदेश सावंत यांची कणकवली पोलिसांनी एक तास चौकशी केली होती.

नितेश राणेंकडून अटक पूर्व जामीन अर्ज दाखल

नितेश राणे यांनी आज दुपारी तीन वाजता अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी हा अर्ज दाखल केलाय. त्या अर्जावर उद्या सकाळी 11 वाजता यावर सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. नितेश राणेंचे वकील संग्राम प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश राणेंवर कुठलाही गुन्हा दाखल नाही. तरीही खबरदारी म्हणून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

सध्या कणकवलीत ज्या हालचाली सुरुये त्यावरुन उद्या नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, आज कणकवलीत नितेश राणे यांच्या अटकेसाठी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात मिटींग झाली. यावेळी या बैठकीला राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, डीएसपी दाभाडे उपस्थित होते.

आतापर्यंत सहा आरोपी अटकेत - पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणातील संतोष परब यांच्या हल्ल्यासंदर्भात 6 आरोपी पकडले असल्याची माहिती दिली. तर एका आरोपीला दिल्लीवरुन पकडले आहे. कालच एकाला कणकवली न्यायालयामध्ये हजर करून 4 जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. घटनाक्रमाचा तपास सुरू असल्याचंही दाभाडे यांनी सांगितले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT