सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यावर खबरदारी म्हणून नितेश राणे यांच्या वकिलांनी आज जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार, अशी माहिती आहे. (Shivsena Santosh Parab Attack Case Nitesh Rane files pre-arrest bail application)
नितेश राणेंकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल
नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज दुपारी तीन वाजता अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी हा अर्ज दाखल केलाय. त्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता यावर सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.
नितेश राणेंचे वकील संग्राम प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश राणेंवर कुठलाही गुन्हा दाखल नाही. तरीही खबरदारी म्हणून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा -
सध्या कणकवलीत ज्या हालचाली सुरुये त्यावरुन उद्या नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, आज कणकवलीत नितेश राणे यांच्या अटकेसाठी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात मिटींग झाली. यावेळी या बैठकीला राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, डीएसपी दाभाडे उपस्थित होते.
नितेश राणे नॉट रिचेबल - सूत्र
या सर्व प्रकरणात सध्या नितेश राणे हे नॉट रिचेबल आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांचा फोनही बंद आहे. तसेच, त्यांचे पीए देखील नॉट रिचेबर आहेत. त्यामुळे उद्या नेमकं काय होणार, नितेश राणेंना अटक होणार का, की त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला जाणार हे पाहावं लागणार आहे.
6 आरोपी पकडले - पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणातील संतोष परब यांच्या हल्ल्यासंदर्भात 6 आरोपी पकडले असल्याची माहिती दिली. तर एका आरोपीला दिल्लीवरुन पकडले आहे. कालच एकाला कणकवली न्यायालयामध्ये हजर करून 4 जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. घटनाक्रमाचा तपास सुरू असल्याचंही दाभाडे यांनी सांगितले.
नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
सध्या जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपाना उधाण आले असतानाच संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणेंना अटक करण्याचा डाव महाविकास आघाडीचे नेते करत असल्याचा आरोप केंद्रीयउद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द अप्पर पोलीस महासंचालक कणकवलीत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.