Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Latest Update SAAM TV
महाराष्ट्र

Thackeray VS Shinde: शिवसेना पक्षाचा निर्णय आल्यानंतर ठाकरे गटाआधी शिंदे गट सुप्रीम कोर्टात, कॅव्हेट केला दाखल

शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Thackeray VS Shinde : उद्धव ठाकरेंच्या  (Udhav Thackeray)  हातून शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह गेल्यानंतरही शिंदे शांत झालेला नाही. शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवण्यासाठी शिंदे गट आवश्यक असलेल्या सर्व हालचाली करत आहेत. आता शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल केली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे या याचिकेत म्हटले आहे. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षासंदर्भात निर्णय देताना शिंदे गटाला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये. यासाठी शिंदे (Eknath Shinde) गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका (कॅव्हेट) दाखल केली आहे.

शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत दिले होते. सोमवारी ठाकरे गट या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो, असे मानले जात आहे. अशा स्थितीत ठाकरे गटाचे कोणतेही पाऊल उचलण्याआधीच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालय गाठले आहे.

शिवसेना शाखा हा पक्षाचा आधार आणि कणा मानला जातो. जोपर्यंत शाखा आहेत तोपर्यंत ठाकरे कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही पुनरागमन करू शकते. अशा स्थितीत शिंदे गटाने आता याकडे लक्ष वळवलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शुक्रवारी रत्नागिरीच्या दापोलीत स्थानिक शाखेच्या ताब्यावरुन दोन गटात हाणामारी झाली होती. दुसरीकडे, शाखांचे जाळे त्यांच्याकडे असून ते कुठेही जाणार नसल्याचे उद्धव गटाचे नेते सांगत आहेत.

शिवसेना भवन कुणाचे?

दादर येथे शिवसेना भवन अर्थात शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय कोणाचे होणार हा मोठा प्रश्न आहे. या इमारतीचे बाजारमूल्य अंदाजे 300 कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेची इमारत शिवाई ट्रस्टची असून, ज्याचे अध्यक्ष लीलाधर डाके आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेची इमारत कायम ठेवण्याची शक्यता असली तरी विधान भवन आणि शिवालयासह बीएमसी कार्यालयावर शिंदे गटाकडून दावा केला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Wangchuk: 'अन्यायापासून ते मुक्तीपर्यंत...' सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून पहिला मेसेज, २० जुलैसाठी देशवासियांना आवाहन

Maharashtra News Live Update: हायकोर्टाचा दणका अन् पोलिसांचा अॅक्शन मोडवर, शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगार, DA आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Jennifer Winget चा पती William Ishmael आहे तरी कोण? घटस्फोटानंतर १२ वर्षांनी अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार

SCROLL FOR NEXT