shambhuraj desai SaamTv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai: आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शंभूराज देसाई स्पष्टच बाेलले

राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

सचिन आगरवाल

अहमदनगर - राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे गटाच्या नेत्यांना गद्दार म्हटल जात यावर बोलताना गद्दार कोण असा सवाल त्यांनी ठाकरे गटाला विचारला आहे. आम्ही कोणीही शिवसेना सोडलेली नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्वलंत हिंदूत्वाच्या विचारा पासून शिवसेना बाजूला जात आहे.

महाविकास आघाडी सरकार मध्ये शिवसेनेचे (Shivsena) नुकसान झालं, शिवसैनिकांचे नुकसान होतेय ते थांबण्यासाठी तसच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जे काम अभिप्रेत होत ते पुढे घेऊन जाण्यासाठी ही भूमिका घेण्यात येत आहे. त्यामुळे याला गद्दार म्हणता येणार नाही असा टोला देसाई यांनी ठाकरे गटाला लगावलाय.

यंदा दसरा मेळाव्या वरून राजकारण सुरू असताना एकनाथ शिंदे गटाने घेतलेली भूमिका ही सर्व सामान्य जनतेने स्वीकारलेली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील जनता कोणा बरोबर आहे हे दसऱ्याच्या दिवशी दिसेल असे ही देसाई म्हणाले.

हिंदुत्ववादी विचारांच्या बरोबर असणारे लोक जेव्हा एकत्र येतील, तेव्हा हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांच्या मतांचे विभाजन थांबेल असं म्हणत राज ठाकरे यांची मनसे आणि भाजप एकत्र येण्याच्या चर्चेवर शंभूराज देसाई यांनी भाष्य केलंय.

प्रत्येकवेळी सामनात काहीतरी छापून येत, त्यावर काय बोलणार, मुख्यमंत्री दिल्लीत जातात ते राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन जातात. मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीला गेले तेंव्हा राज्याच्या प्रलंबित निधीबाबत त्यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली त्यावर पंतप्रधानांनी देखील राज्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

तुम्ही जेंव्हा मुख्यमंत्री होतात तेंव्हा तुम्ही साधं मंत्रालयात येत नव्हता असं म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवरून सामनातून टीका करण्यात आली होती त्यावर शंभूराज देसाई बोलत होते.

पुढे शंभूराज देसाईमराठा आरक्षणासंदर्भात विचारले असता. सर्व मराठा आंदोलनाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सर्वांची सह्याद्री अतिथी गृहावर मोठी बैठक आयोजित केली होती. mpsc मधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्या पडताळणी मुळे नेमणुका रखडल्या होत्या त्यांच्यासाठी स्पेशल कॅबिनेट निर्णय घेऊन जवळपास 1094 पद रखडली होती त्यांना नेमणुका दिल्या.

मराठा आंदोलकांना जे आश्वासन एकनाथ शिंदे आणि फडणवीस यानी दिलं होत ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी मंत्री मंडळ उपसमिती काम करेल अस आश्वासन शंभूराजे देसाई यांनी दिले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात 30 ते 40 टक्के जागा ह्या रिक्त आहेत. आगामी काळात लवकरच भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल असे आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT