Sanjay Raut, Supriya Sule Saam Tv
महाराष्ट्र

'पुढील २५ वर्ष उद्धव ठाकरे…'; सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे असं साकडं घातलं होतं.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : 2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) बिनसलं. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. आता महाविकासआघाडी सरकार स्थापन होऊन जवळपास अडीज वर्ष पूर्ण झाली आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री म्हणून कारोभार सांभाळत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे असं साकडं घातलं. यावर शिवसेना प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे . (Sanjay Raut Latest News)

सुप्रिया सुळे तुळजापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भवानी मातेचं दर्शन घेतलं. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली. “राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत आमचे तिनही उमेदवार निवडून येतील असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. आमच्याकडे पुरेशी मते आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यावर उत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. सातवी जागा ज्यांनी भरली आहे त्यांना या राज्यात घोडेबाजार करायचा आहे असं दिसत आहे. त्यांच्याकडे तेवढी मते नाहीत. मते असती तर त्यांनी नक्कीच संभाजी छत्रपतींना उमेदवार केलं असतं. आधी संभाजी छत्रपतींना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सहाव्या जागेसाठी उभं करण्याचा भाजपने प्रयत्न केला. आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Jalgaon News : जळगाव शहरात कारमध्ये सापडली वीस लाख रुपयांची रोकड

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

Chhatrapati Sambhajinagar: रेडीको एनव्ही कंपनीमधील बॉयलरचा स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT