बंदी झुगारुन खुद्द शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या प्रमुख उपस्थितीत बैलगाडी शर्यत.... - Saam Tv
महाराष्ट्र

बंदी झुगारुन खुद्द शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या प्रमुख उपस्थितीत बैलगाडी शर्यत....

गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडी शर्यतीला राज्यात बंदी आहे. मात्र बीडमध्ये सरकारच्या बंदीला जुगारून, बीड तालुक्यातील इमामपूर गावात भव्यदिव्य बैलगाडी शर्यत घेण्यात आली आहे

विनोद जिरे

बीड : गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडी शर्यतीला राज्यात बंदी आहे. मात्र बीडमध्ये सरकारच्या बंदीला जुगारून, बीड तालुक्यातील इमामपूर गावात भव्यदिव्य बैलगाडी शर्यत घेण्यात आली आहे. या बैलगाडी शर्यतमध्ये 25 पेक्षा जास्त बैलगाड्यानी सहभाग घेतला होता.

या शर्यतमध्ये गाडी ओढणाऱ्या बैलाला काट्यांनी अमानुष मारहाण करीत गाड्या डांबरी रस्त्यावर पळविल्या. विशेष म्हणजे या बैलगाडी शर्यतीत सत्ताधारी शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंघन, किसान सेनेचे पदाधिकारी परमेश्वर सातपुते शिवसेना जिल्हाप्रमुखचे बंधू गणेश खांडे या सत्ताधारी मंडळींनी या बैलगाडी शर्यतीला हिरवा झेंडा दाखवत उदघाटन केले.

तर भाजप जिल्हाध्यक्ष यांनी या बैलगाडी शर्यतमध्ये जाऊन प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिले. त्यामुळे राज्य सरकारचे कायदे आणि नियमावली फक्त सर्वसामान्य नागरिकांना लागू होते का ? असा प्रश्न उपस्थिती केला गेला आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, या शिवसैनिकांना राज्य सरकारचे कायदे काय आहेत? हे कारवाई करून सांगतील का ? हा खरा प्रश्न आहे. दरम्यान या संदर्भात बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, संतोष साबळे यांना विचारले असता, त्यांनी परवानगी घेतली नाही. त्यामुळे चौकशी सुरू आहे गुन्हे दाखल होतील.असे फोनवरून उत्तर दिले

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेला आणखी एक झटका, शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या अधिकारांवर कात्री

पुण्यात पोलीस भरतीतील घोटाळा उघड, बनावट क्रीडा प्रमाणपत्रांद्वारे नोकरीवर डल्ला

Maharashtra News Live Update: सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त सुरक्षेसह ध्वनी मर्यादा, लेझर लाईटबाबतही घेतला मोठा निर्णय

MPSC पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत? झिरवळांच्या चौकशीची विरोधकांची मागणी

DJ विरोधात पुणेकर रस्त्यावर, DJ वरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT