narayan rane vinayak raut 
महाराष्ट्र

'घरफोड्या राणेस बाळासाहेबांच्या स्मृती स्थळास भेटीचा अधिकार नाही'

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात ज्याने बाळासाहेबांशी बेईमानी केली अशा व्यक्तीस शिवसैनिक साहेबांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन देणार नाहीत असा इशारा खासदार विनायक राऊत vinayak raut यांनी भाजप नेते नारायण राणे narayan rane यांना दिला आहे. राणेंनी त्यांची जन आशिर्वाद यात्रा सुरु हाेण्यापुर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन अभिवादन करणार असल्याचे जाहीर केले आहे. नारायण राणेंच्या या कृतीस शिवसैनिकांचा विराेध असल्याचे खासदार राऊतांनी narayan rane vinayak raut येथे नमूद केले.

खासदार राऊत यांनी येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिले. एका प्रश्नावर ते म्हणाले नारायण राणे सारख्या विश्वास घातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. नारायण राणे सारख्या बाडगा आणि बाळासाहेबांशी ज्याने बेईमानी केली असा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे या घरफोड्याला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट द्यायला शिवसैनिकांचा विराेध असल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले.

दरम्यान ज्या ज्या ठिकाणी नारायण राणे शिवसेनेच्या विरोधात उभे राहतात त्या त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय होतो. त्यावेळी शिवसैनिकांत नारायण राणेचे पानिपत करण्याची ताकद येते. राणेंचा चेहरा हा फक्त भाजपमधील काही लाेकांसाठी राहिला आहे.

त्यामुळे नारायण राणे यांना कोणतेही जबाबदारी द्या, शिवसेना आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकला शिवाय राहणार नाही असा विश्वास मुबंई महापालिकेच्या आगामी काळात हाेणा-या निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live : ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं उघडलं, बार्शीत एकाच प्रभागात २ उमेदवार विजयी

Shocking : ३ कोटींच्या इन्श्यूरन्ससाठी पोटची २ मुलं बनली हैवान; वडिलांनाच मारण्यासाठी सोडला विषारी साप अन्...

मनमाड मतमोजणी केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा, नेमके काय घडले? VIDEO

Nagarparishad Election Result: सुरूवातीचे कल हाती! महायुती १९० पालिकांमध्ये आघाडीवर, महाविकास आघाडीची स्थिती काय?

Gold Rate Today: सोन्याचे दर जैसे थे वैसे! १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT