Rajendra Gavit meets cm eknath Shinde  twitter
महाराष्ट्र

शिवसेना खासदार राजेंद्र गावित शिंदे गटात सामील होणार ? गावितांनीच केला मोठा खुलासा

काल पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावीत यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. मात्र, त्यानंतर खासदार गावीत शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यावर आता खासदार गावित यांनी मोठा खुलासा केला आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हे विराजमान झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे. त्यानंतर सेनेचे अनेक आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहे. तर अनेकांकडून मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत आहेत. काल पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावीत यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. मात्र, त्यानंतर खासदार गावीत शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यावर आता खासदार गावित यांनी मोठा खुलासा केला आहे. (Maharashtra Political News In Marathi )

वसई-विरार सह पालघर (Palghar) जिल्ह्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्त्यानी काल उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे कालपासून पालघर ,वसई विरारमधील शिवसेना फुटीची चर्चा चांगलीच आहे. काल वसई-विरार महानगरपालिकेतील ५, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत पालघर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावितही यावेळी उपस्थित होते. त्यामुळे खासदार गावित शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यावर आता सेना खासदार गावितांनी स्पष्टीकरण दिले आहे.

गावित म्हणाले, मी अद्याप शिंदेंच्या गटात सामील झालो नाही. मुख्यमंत्र्याशी झालेली माझी कालची भेट ही सदिच्छा भेट होती. माझ्या मतदार संघातील एमएमआरडीए तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामासंदसर्भात माहिती देण्यासाठी भेट घेतली असल्याचे स्पष्टीकरण गावित यांनी दिले'. शिंदे व ठाकरे गट एकत्र आल्यास चांगल्या प्रकारे कामे होऊ शकतात असेही ते म्हणालेत. शिंदेंच्या भेटीनंतर खासदार गवितांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे स्थानिक शिवसेनेत मात्र संभ्रम पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

Weekly Horoscope: या राशींना मेहनतीचे चांगले फळ मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT