Mla Sanjay Gaikwad warns BJP
Mla Sanjay Gaikwad warns BJP  Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad: 'आम्ही 125 ते 130 जागा लढवणार...' बावनकुळेंच्या वक्तव्यावर आमदार संजय गायकवाड आक्रमक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Gaikwad: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या एका वक्तव्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. यामध्ये त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युल्याबाबत जागावाटपाचा खुलासा केला होता. यावेळी बोलताना त्यांनी भाजप 240 जागा लढवणार तर 48 जागा शिवसेनेला देणार असल्याचे सांगितलं.

त्यानंतर बावनकुळेंच्या वक्तव्याने युतीत वाद निर्माण होऊ नये म्हणून भाजपने भाषणाचा व्हिडीओच सोशल मीडियावरुन हटवला आहे. मात्र आता शिंदे गटाचे संजय गायकवाड यांंनी आमदार यावर आक्रमक पवित्रा घेत बावनकुळेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

"कोण कुठला नेता काय म्हणतो त्याला काही महत्व नाही. आम्ही शिवसेना म्हणून 125 ते 130 जागा लढवणार असल्याचं वक्तव्य शिवसेना आमदार (शिंदे गट) संजय गायकवाड यांनी केले आहे. "सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा शिंदे गट नसून शिवसेना आहे. आमची बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आहे. ही शिवसेना आणि भाजपची युती आहे. त्यामुळे कोण कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्याला काही महत्त्व नसल्याचे" संजय गायकवाड म्हणाले.

तसेच याबद्दल पुढे बोलताना भाजप आमच्यापेक्षा मोठा पक्ष असल्यामुळे निश्चितच आमच्यापेक्षा थोड्याफार जागा ते जास्त लढतील. पण आम्ही शिवसेना म्हणून 125 ते 130 च्या खाली जागा लढणार नसल्याचे संजय गायकवाड म्हणाले.

दरम्यान,त्या व्हिडिओमधील अर्धाच भाग दाखवण्यात आला. शिवसेना आणि भाजप 288 जागा युतीत लढणार आहे, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. बावनकुळेंच्या वक्तव्याने युतीत वाद निर्माण होऊ नये म्हणून भाजपने भाषणाचा व्हिडीओच सोशल मीडियावरुन हटवला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmednagar Election Voting LIVE : मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा उशिराने

Axar Patel Statement: इथंच दिल्लीने सामना गमावला! अक्षर पटेलने सांगितला टर्निंग पॉईंट

Unseasonal Rain Hits Washim: अवकाळी पावसाचा शेतक-यांना फटका, वाशिम जिल्ह्यात 7 हजार 780 हेक्टर पिकांचे नुकसान

Amol Kolhe News | 'बैलगाडा शर्यत सुरु करण्याचं कारण गोसंवर्धन करणे हाही' - कोल्हे

Jalgaon Accident : कारची दुचाकीला धडक; गर्भवती महिलेचा मृत्यू, पतीसह चार वर्षीय बालिका जखमी

SCROLL FOR NEXT