Maharashtra Election Voting LIVE : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उद्या सुनावणी

Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates: महाराष्ट्रातील पुणे, शिरुर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, शिर्डी आणि बीड या ११ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे.
Maharashtra Lok Sabha election phase 4 voting live Update
Maharashtra Lok Sabha election phase 4 voting live UpdateSaam TV

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उद्या सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह आयोगाने एकतर्फी अजित पवार यांना दिल्याच शरद पवार यांच्या पक्षाचं याचिकेत मत

न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्हि विश्वनाथन यांच्या पिठा समोर होणार सुनावणी

मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने अजित पवार यांना हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे अशा जाहिराती देण्याचे निर्देश दिले होते

निवडणुका सुरू असताना उद्या होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काही नवी दिशा देत का हे पाहणं महत्वाचं

कल्याण पश्चिमेकडील रामदासवाडी परिसरात मैत्रेय अपार्टमेंटला लागली आग

कल्याण पश्चिमेकडील रामदास वाडी परिसरातील घटना

मैत्रेय अपार्टमेंट या तीन मजली इमारतीच्या एका घराला लागली आग

घरातील सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती

कारण अद्याप अस्पष्ट

घरात राहणारे कुटुंब कामानिमित्त बाहेर गेल्याने सुदैवाने जीवित हानी नाही

मावळ लोकसभा मतदारसंघातील आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत दद्दीतील आगरी कोंढरीपाडा गावातील ग्रामस्थांनी आज मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आलेय. गावच्या श्री हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना वर्षभरापूर्वी झाली होती मात्र आरोपीवर गुन्हा दखल होऊन देखील कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. गावात एकूण 1700 जणांचे मतदान होते त्यातील 1500 मतदारांनी मतदानावर बहिष्कार घालत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी आरोपीवर कारवाई झाली नाही तर लोकसभा निवडणुकी नंतर आता विधानसभेच्या निवडणूकीवरही बहिष्कार घालू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.

हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने धावणार

हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने.

वादळी वाऱ्यामुळे पेंटागॉन मध्ये बिघाड झाला होता.

पेंटागॉन मधील बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी रेल्वे 5 ते 10मिनिट उशिराने धावत आहेत.

Mumbai Rain : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू, अद्यापही काही जण अडकल्याची भीती

घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण अजूनही अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ठाण्यावरून कल्याण आणि कसारा लोकल सुरू

ठाणे रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून लोकल धावत नाहीत. मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून कल्याण आणि कसारा येथे जाणार्‍या लोकल सुरू आहेत. केवळ मुंबईच्या दिशेने जाणार्‍या लोकल प्लॅटफॉर्म नंबर 6 वरुण जात आहेत. तसेच 2 नंबर प्लॅटफॉर्मच्या गाड्या 5 नंबवरू कल्याणच्या दिशेने जात आहेत.

पालघर जिल्ह्यात  वीज पडून 3 जण जखमी

पालघर जिल्ह्यात आज झालेल्या अवकाळी वादळी पावसात वीज पडून 3 जण जखमी, डहाणू तालुक्यातील आंबोली कोकणपाडा येथील तरुण आलेल्या अवकाळी पाऊसापासून वाचण्यासाठी झाडाखाली उभे असताना जवळच वीज पडल्याने झाले जखमी , जखमींवर तलासरी रुग्णालयात उपचार सुरू.पालघर जिल्ह्यात डहाणू, चारोटी,तलासरी ,जव्हार ,मोखाडा भागात विजेच्या कडकडाटसह कोसळल्या वादळी अवकाळी पावसाच्या सरी.

शिरुर लोकसभेत मतदारांच्या मतांची किंमत ५०० रुपये, अमोल कोल्हेंनी व्हिडिओ शेअर करत केला गंभीर आरोप

शिरुर लोकसभा मतदार संघात महायुतीकडुन पैशाचा थेट वापर झाल्याचा पुरावाच देत अमोल कोल्हेंनी सत्ताधारी आणि प्रशासकिय आधिका-यांना गंभीर आरोप केलाय.

शिरुर लोकसभेच्या मतदानावेळी महायुतीकडुन खेड तालुक्यातील शिरोली येथे पैशाचा थेट वाटप करत मतदारांच्या मताची ५०० रुपयांची किमत केल्याची आरोप अमोल कोल्हेंनी विडिओ शेअर करत केलाय मात्र याकडे झोपलेल्या सत्ताधारी आणि प्रशासकिय आधिका-यांना जाग येत नसल्याचा आरोप केलाय...

Mumbai Rain : घाटकोपरमधील कोसळलेल्या होर्डिंगखालून 47 जणांना बाहेर काढलं

घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल.

घाटकोपर दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा रद्द

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा रद्द

घाटकोपर दुर्घटनेमुळे फडणवीस यांची आजची सभा रद्द

आज रात्री ८ वाजता मुलुंड येथील कॅम्पस हॉटेल चौकात होते सभेचे नियोजन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा रद्द

घाटकोपर दुर्घटनेमुळे फडणवीस यांची आजची सभा रद्द

आज रात्री ८ वाजता मुलुंड येथील कॅम्पस हॉटेल चौकात होते सभेचे नियोजन

पुणे शहरात मुसळधार पाऊस, रस्त्यांवर साचलं पाणी

पुणे शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

दिवसभर उखाड्याने हैराण झाले होते पुणेकर

सहा वाजता उपनगरासह अनेक भागात जोरदार पाऊस

अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी जमा तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

दुर्घटना घडलेल्या ठिकाणी तात्काळ यंत्रणा पोहोचवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई आणि परीसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जीथे दुर्घटना घडल्या आहेत, तीथे तात्काळ मदत यंत्रणा पाठवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील CCTV बंद

बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील CCTV बंद  असल्याचा आरोप करण्यात आला आहे. साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर CCTV पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.

घाटकोपरमधील कोसळलेल्या होर्डिंगखालून ३५ जणांना बाहेर काढलं

घाटकोपरमध्ये होर्डिंगकोसळल्यानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. होर्डिंगखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून ३५ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात झुंजीत वाघाचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या कारवा जंगलात अडीच वर्षीय नर वाघ मृतावस्थेत आढळला आहे. वनकर्मचारी गस्त करत असताना किन्ही जंगलात हा वाघ मृतावस्थेत आढळला. 2 वाघांच्या झुंजीत हा मृत्यू ओढवला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. वाघाचे शव विच्छेदनासाठी वन्यजीव शुश्रूषा केंद्रात रवाना करण्यात आले आहे. वनपथक घटनेचा पुढील तपास करत आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मोठी गर्दी

रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरती मोठी गर्दी

गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे पोलिस सतर्क.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, बद्दलापुर कडे जाणार्या लोकल उशिराने.

एसी लोकल देखील उशिराने

प्रवाश्यांचे हाल

नवापूर विधानसभा मतदारसंघात विक्रमी ७० टक्के मतदान

आज लोकसभेसाठी राज्यात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत नवापूर विधानसभा मतदारसंघ अव्वलस्थानी राहण्याची शक्यता आहे 5 वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले आहे, अंतिम आकडेवारी 75 टक्क्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही

जालना मतदारसंघात ६ नंतरही मतदान केंद्रांबाहेर मतदानासाठी नागरिकांच्या रांगा

जालना लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ सायंकाळी 6 वाजता संपली आहे मात्र अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब राहा यला पाहायला मिळत आहे. दुपारनंतर उन्हाचा चटका कमी झाल्याने 4 ते 6या वेळेत नागरिकांनी मतदान केंद्रावर एकच गर्दी केल्याच चित्र पाहायला मिळत आहे आणि याचंच एक उदाहरण म्हणजे जालना शहरातील इंदेवाडी येथील मतदान केंद्रावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. ज्या लोकांना पोल चीट किंवा टोकन दिलेला आहे त्यांनाच या ठिकाणी मतदान करता येणार आहे साधारणपणे अजून एक तास हे मतदान प्रक्रिया चालेल. या ठिकाणी महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे.

सीएसटीवरून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल उशीराने धावणार

मुंबई आणि परिसराला आज वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. याचा लोकलवरही परिणाम झाला आहे.

घाटकोपरमध्ये दुर्घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल दाखल

घाटकोपर आंबेडकर नगर येथील पेट्रोल पापांला लागून असलेली शेड अचानक कोसळल्याने एकच तारांबळ उडालेली आहे मुंबई पोलिस अग्निशमन दल हे देखील घटना स्तळी दाखल झालेले आहे नागरिक देखील मोठ्या संख्येने गर्दी करून आहेत

चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ५२.४९ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार - ६०.६० टक्के

जळगाव - ५१.९८ टक्के

रावेर - ५५.३६ टक्के

जालना - ५८.८५ टक्के

औरंगाबाद - ५४.०२ टक्के

मावळ - ४६.०३ टक्के

पुणे - ४४.९० टक्के

शिरूर - ४३.८९ टक्के

अहमदनगर- ५३.२७ टक्के

शिर्डी - ५२.२७ टक्के

बीड - ५८.२१ टक्के

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत अंदाजे ६० टक्के मतदान

अक्कलकुवा 56.40 टक्के

शहादा 63.46 टक्के

नंदुरबार 58.53 टक्के

नवापूर 69.46 टक्के

साक्री 60.25 टक्के

शिरपूर 55.98 टक्के

60.60 टक्के

पुणे लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत 44.90 टक्के मतदान

कसबा पेठ - 51.07%

कोथरूड - 48.91%

पर्वती - 46.80%

पुणे कॅन्टोन्मेंट - 44.01%

शिवाजीनगर - 38.73%

वडगाव शेरी - 40.50%

मावळ लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत 46.0३ टक्के मतदान

दुपारी 5 वाजता पर्यंत 46.03% झालं मतदान

पुणे लोकसभा मतदारसंघातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील यादीतून अनेकांची नावे वगळल्यामुळे संताप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित शहा यांनी हेलिकॉप्टने जानं टाळलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टने जाने टाळले

हवामान खराब झाल्याने मुख्यमंत्री यांनी हेलिकॉप्टर मधून जाणे टाळले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारने मुंबईला रवाना

केंद्रीय मंत्री अमित शहा देखील कारने मुंबई विमानतळकडे रवाना

शाह यांनी देखील हेलिकॉप्टरने जाणं टाळलं

अवकाळी पावसाने मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय मंत्री कारने रवाना

Mumbai Local Train News : कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट लोकलचा मार्ग बदलला, कळवा व मुंब्रा स्थानकावर थांबवणार

कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट लोकलचा मार्ग बदलला.

कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे कळवा मुंब्रा मार्गावर वळवल्या

फास्ट लोकल कळवा व मुंब्रा स्थानकावर थांबवणार

अवकाळी पावसामुळे ठाणे, कल्याण, बद्द्लापूर च्या दिशेने जाणार्या वाहतुकीवर परिणाम

मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन बदलल्याच्या विरोधात 'वंचित'चं धरणे आंदोलन

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दिवशी कारण नसतांना ईव्हीएम मशिन बदलण्यात आल्याचा आरोप वंचितच्या वतीने करण्यात आलाय. ईव्हीएम बदलत असताना किंवा बदलल्यानंतर उमेदवारांना याची माहिती देण्यात आली नाही. त्यांमुळे प्रशासनाने ईव्हीएम मशिन का बदलल्या याचा जाब विचारण्यासाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, हिंगोली शहरासह सेनगाव कळमनुरी व औंढा तालुक्यात सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाल्याने रस्त्याने वाहतूक करणाऱ्या अनेक वाहन चालकांना आपली वाहने थांबवावी लागली आहेत तर शहरातील मुख्य बाजारपेठेत वादळी वारे व पावसाने पावन तास व्यापाऱ्यांना देखील पावसापासून आपल्या दुकानातील साहित्याचं संरक्षण करावं लागलं आहे.

जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यात पावसामुळे मतदार केंद्र बंद करण्याची वेळ

जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यात पाऊसाच्या सरी होत असल्याने मतदार केंद्र बंद करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

जुन्नर तालुक्यातील उत्तर भागात गारपिठ झालीय तर शहरी भागात पाऊसाच्या सरी सुरु झाल्याने याचा थेट परिणाम मतदानावर होत असुन कार्यकर्त्यांनी बुथ बंद करण्यास सुरुवात केलीय

मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एक्सप्रेस धीम्या गतीने धावतायेत

अचानक सुरु झालेल्या पावसामुळे रेल्वे सेवेला फटका बसला आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे रेल्वे सेवा 10 मिनिटाने उशिराने धावत आहे. तर मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एक्सप्रेस देखील धीम्या गतीने धावत आहे

मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा लंके यांचा आरोप

मतदानाला जाण्यापूर्वीच बोटाला शाई लावून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप निलेश लंके यांनी केलाय. स्वतःमविआ उमेदवार निलेश लंके यांनी संबंधित व्यक्तीला पकडले. प्रत्येक मतांसाठी ५०० रुपये देऊन बोगस मतदान करून आणले जात असल्याचा आरोपही निलेश लंकेने केलाय. धरती चौक मतदान केंद्राबाहेर हा प्रकार घडल्याचा दावा लंकेंनी केलाय.

घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगखाली १५० जण अडकल्याची भीती

आज आलेल्या वादळात घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं असून १५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अचानक आलेल्या पावसाने मध्य रेल्वेला फटका, लोकलचं वेळापत्रक कोलमडलं

अचानक आलेल्या पावसाचा मध्य रेल्वेला फटका

लोकल ट्रेनच वेळापत्रक कोलमडलं

तर एक्सप्रेस ट्रेनना देखील बसला फटका

अनेक ट्रेन मध्येच थांबवण्यात आल्या

ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांचे हाल

अवकाळी पावसाचा फटका; उद्धव ठाकरे यांची डोंबिवलीमधील सभा रद्द

मुंबई आणि परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका राजकीय नेत्यांना बसलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची डोंबिवलीमध्ये प्रचार सभा होणार होती.

अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तारांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी त्यांची दोन मुले माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर व नॅशनल सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर हे सोबत होते.

वडाळा बरकत अलीनगर येथे कार पार्किंग लिफ्ट कोसळली

मुंबई आणि उपनगरात वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावलीय. सोसाट्याच्या वाऱ्याने फ्लेक्स आणि बॅनर पडण्यच्या दुर्घटना घडत आहेत. वडाळा बरकत अलीनगर येथे रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीवर लिफ्टचा भाग कोसळलाय. कारमध्ये लोक असल्याची भीती व्यक्त करण्यात आलीय.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा रोहित पवारांना टोला

रोहित पवारांचे ट्वीट हे नैराश्यातून बारामतीतील पराभव दिसत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या रोहित पवारांनी असं वक्तव्य केलं असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे रोहित पवार यांनी ट्विट करून विखेंकडून बंद लिफाफ्यातून प्रसाद वाटप सुरू असल्याचं म्हटलं आहे. पाच मिनिटात यावर प्रतिक्रिया देताना विखे यांनी बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, येथील जनतेने यापूर्वी हे दाखवून दिलेला आहे, असं म्हटलंय.

LOk Sabha Election : रामदेववाडी गावाने टाकला मतदानावर बहिष्कार

रामदेववाडी येथे चार दिवसांपूर्वी अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

जळगावमध्ये 42 .15 टक्के तर रावेर लोकसभा मतदारसंघात 45.26  टक्के मतदान

जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतची मतदान टक्केवारी

जळगाव लोकसभा मतदारसंघ -42 .15 %

विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे

13 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –39.23 %

14 जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –45.02 %

15 अमळनेर विधानसभा मतदारसंघ –41.16 %

16 एरंडोल विधानसभा मतदारसंघ –46.04 %

17 चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –39.07 %

18 पाचोरा विधानसभा मतदारसंघ -43.80 %

▪️

रावेर लोकसभा मतदारसंघ -45.26 %

विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे

10 चोपडा विधानसभा मतदारसंघ –46.16 %

11 रावेर विधानसभा मतदारसंघ –48.71 %

12 भुसावळ विधानसभा मतदारसंघ –43.16 %

19 जामनेर विधानसभा मतदारसंघ –41.70 %

20 मुक्ताईनगर Programs मतदारसंघ –43.10 %

21 मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 48.67 %

पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले, आमदार, पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

पुण्यातील पाटील इस्टेट या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर भिडले

शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली

जालन्यात 250 परप्रांतियांची मतदार यादीत नावं, गावातील मूळ 49 मतदारांची नावं वगळल्याचा आरोप

जालन्यातील दरेगाव येथील मतदान केंद्रावर, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदानावर आक्षेप,

गावातील रहिवाशी नसलेले परप्रांतीय 250 जणांना यादीत घुसवले, तर गावातील मूळ 49 मतदारांचं नाव वगळल्याचा आरोप

चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.३५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार - ४९.९१ टक्के

जळगाव - ४२.१५ टक्के

रावेर - ४५.२६ टक्के

जालना - ४७.५१ टक्के

औरंगाबाद - ४३.७६ टक्के

मावळ - ३६.५४ टक्के

पुणे - ३५.६१ टक्के

शिरूर - ३६.४३ टक्के

अहमदनगर- ४१.३५ टक्के

शिर्डी - ४४.८७ टक्के

बीड - ४६.४९ टक्के

Shirdi Lok Sabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत 44.87 टक्के मतदान

शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत 44.87 टक्के मतदान

पुणे लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत 33.07 टक्के मतदान

पुणे लोकसभा दुपारी 3 वाजेपर्यंत झालेलं एकूण मतदान -

कसबा पेठ 35.23%

कोथरूड 37.02%

पर्वती 38.01%

पुणे कॅन्टोन्मेंट 31.01%

शिवाजीनगर 26.61%

वडगाव शेरी 29.27

जालना तालुक्यात राज्यातील कामगारांची मतदार यादीत नावं, ग्रामस्थांनी घेतला आक्षेप

जालना तालुक्यातील दरेगाव येथे इतर राज्यातील कामगारांची मतदार यादीत नावं, ग्रामस्थांकडून अक्षेप. सात ते आठ जणांनी पाठवले परत.

वसईत अमित शाह यांचे थोड्याच वेळात आगमन

पालघर लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी अमित शाह वसईत जाहीर सभा

वसईच्या सन सिटी मैदानात जाहीर सभेचे आयोजन..साडे चारच्या सुमारास शाह सभा स्थळी आगमन

महायुतीचे कार्यकर्ते मोठया संख्येने जाहीर सभेत सहभागी

अमित शाह सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार..

Maval Lok Sabha : मावळ लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपळे गुरव येथील मनपा प्राथमिक शाळेत दुपारी ३ वाजताही भर उन्हात मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. तीन वाजेपर्यंत सुमारे ३५ % मतदान झाले.

Nandurbar : नंदुरबारमध्ये विक्रमी मतदान होण्याची शक्यता; १ वाजेपर्यंत ३७.३३ टक्के मतदान

- नंदुरबार लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी ०१ वाजेपर्यंत ३७.३३ टक्के मतदान

- मतदान अधिक होत असल्याने विक्रमी मतदान होण्याची शक्यता आहे.

- नवापूर विधानसभेमध्ये दुपारपर्यंत 45 टक्के मतदान

राज्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान झालं आहे.

नंदुरबार - ३७.३३ टक्के

जळगाव- ३१.७० टक्के

रावेर - ३२.०२ टक्के

जालना - ३४.४२ टक्के

औरंगाबाद - ३२.३७ टक्के

बीड - ३३.६५ टक्के

मावळ -२७.१४ टक्के

पुणे - २६.४८ टक्के

शिरूर- २६.६२ टक्के

अहमदनगर- २९.४५ टक्के

शिर्डी -३०.४९ टक्के

Lok Sabha News : दोन टप्प्यातील मतदानाची आकडेवारी उशिरा जाहीर केली; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या दोन टप्यातील मतदानाची आकडेवारी उशिरा जाहीर केल्याने निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकडून याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांचे वकिल प्रशांत भुषण यांनी तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुरुवातीच्या मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीत मोठी वाढ झाल्याच्या याचिकेत उल्लेख आहे. या प्रकरणी 17 मे रोजी सुनावणी घेऊ, अशी माहिती न्यायमुर्ती संजीव खन्ना यांनी याचिकाकर्त्यांना दिली.

Pune Lok Sabha Voting Live : पुण्यात आणखी एक केंद्रावर मशीन पडली बंद

पुण्यातील आणखी एका केंद्रावर मशीन पडली बंद केल्या आहेत.

पुण्यातील मुंढव्यामध्ये रूम नंबर पाचमध्ये मशीन बंद पडली.

मतदान केंद्रावर असलेली ईव्हीएम बंद पडली आहे.

ऐन दुपारच्या सत्रात गेल्या पाऊण तासांपासून मतदान करण्यासाठी मशीन बंद

शिरूर लोकसभा मतदारसंघाील विधानसभा मतदारसंघीकी एका केंद्रात मतदान मशीन बंद पडली.

Baramati News Live : बारामती ईव्हीएम गोदामतील सीसीटीव्ही पुन्हा सुरु

बारामती ईव्हीएम गोदमतील सीसीटीव्ही बंद झाले होते. शरद पवार गटाने तक्रार करत ही बाब निर्दशनास आणून दिली होती. त्यानंतर बारामती ईव्हीएम गोदामतील सीसीटीव्ही पुन्हा सुरु झाले आहेत.

Pune Lok Sabha Voting Live : आदर पूनावाला यांनी बजावला मतदानाचा हक्क

सिरम ग्रुप चे CEO आदर पूनावाला यांनी पुण्यातील ह्यूम मॅक हेन्री मेमोरियल महाविद्यालय सॅलिस्बरी पार्क येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी श्रीनाथ भिमाले व वंदनाताई श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.

Maharashtra voting Live : राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

नंदुरबार - २२.१२ टक्के

जळगाव- १६.८९ टक्के

रावेर - १९.०३ टक्के

शिरूर- १४.५१ टक्के

अहमदनगर- १४.७४ टक्के

शिर्डी -१८.९१ टक्के

बीड - १६.६२ टक्के

जालना - २१.३५ टक्के

औरंगाबाद - १९.५३ टक्के

मावळ -१४.८७ टक्के

पुणे - १६.१६ टक्के

Pune Voting live : पुणे जिल्ह्यात अकरावाजेपर्यंत १६.१६ टक्के मतदान

पुणे लोकसभा मतदारसंघ, मतदान टक्केवारी (सकाळी ११ वाजेपर्यंत) :

१६.१६ %

विधानसभा निहाय:

कसबा पेठ १८.१०

कोथरूड १८.२०

पर्वती १७.८४

पुणे कॅन्टोन्मेंट १३.८९

शिवाजीनगर १३.९४

वडगाव शेरी १४.६७

------

मावळ लोकसभा मतदारसंघ : १४.८७ %

चिंचवड १४.९३

कर्जत १४.२७

मावळ १४.७५

पनवेल १४.७९

पिंपरी १३.०९

उरण १७.६७

------

शिरूर लोकसभा मतदारसंघ : १४.५१ %

आंबेगाव १८.४७

भोसरी १२.७९

हडपसर १४.४०

जुन्नर १७.०६

खेड आळंदी १४.५४

शिरूर १२.२५

Jalna Lok Sabha Voting Live : जालन्यात तीन ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलं

जालन्यात मतदान सुरू झाल्यापासून तीन ठिकाणी मशीन बंद पाडण्याचे घडले प्रकार. पैठण येथील एका मतदान केंद्रावर पूर्ण संच बदलण्याची वेळ आली. अंबड तालुक्यातील अमलगाव, भोकरदन शहरातील एका मतदान केंद्रावर मशीन बंद पडली होती. दुरुस्तीनंतर मतदान प्रकिया सुरळीत झाली.

Ahmednagar voting Live : पाथर्डीतील मतदान केंद्रावर ग्रामस्थांनी बंद पाडलं मतदान

नगरच्या पाथर्डी तालुक्यातील घुमट वाडी मतदान केंद्रांवरील आधिकरी कमळ चिन्हावर मतदान करा, असे सांगत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी केला. त्यानंतर या ग्रामस्थांनी मतदान केंद्र बंद पाडलं. या आरोपानंतर केंद्राला भेट देण्यासाठी तहसीलदार रवाना झाले आहेत.

Pune Lok Sabha Election Voting Live : पुण्यात आणखी एका केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडलं, मतदारांचा खोळंबा

पुण्यातील मॉडेल कॉलनीत ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. केंद्रावर गेल्या २५ मिनिटांपासून मतदार बसून आहे. विद्या भवन शाळेतील मतदान केंद्रावरील मशीन बंद आहे. पुण्यातील वडगाव शेरी भागातील मशीन बंद प्रकरणानंतर आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.

Pune Lok Sabha Voting live : पुण्यात भाजप कार्यकर्ते आक्रमक, बुथवर ठिय्या आंदोलन

मतदानाच्या बूथ वर काँग्रेस पक्षाचे बॅनर लावल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

बॅनर काढण्यासाठी बुधवार भाजप कार्यकर्त्यांसाठी ठिय्या आंदोलन केलं.

पुण्यातील फडके हाऊस चौक येथे असलेल्या बुथवर भाजप कार्यकर्ते एकवटले आहेत.

Central Railway :  मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा उशिराने

मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कल्याण ते कुर्लादरम्यान वाहतूक विस्कळीत

गेल्या १० मिनिटांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

आठवड्यातील पहिल्यादिवशी सिग्नल यंत्रणेत बिघाड

Shirdi Lok Sabha voting live : 'वंचित'च्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी बजावला मतदानाचा हक्क

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी बजावला मतदानाचा हक्क आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले येथे मतदान केले आहे. शिर्डीत उत्कर्षा रूपवते यांच्या उमेदवारीने तिरंगी लढत होत आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत आहे.

 Lok Sabha Election Live :महाराष्ट्रात आतापर्यंत ६ .४५ टक्के मतदान

महाराष्ट्रात ९ वाजेपर्यंत ६ .४५ टक्के मतदान झालं आहे.

आतापर्यंत सर्वाधिक मतदान नंदूरबारमध्ये झालं आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

जळगाव- ६.१४ टक्के

जालना - ६.८८ टक्के

नंदुरबार - ८.४३ टक्के

शिरूर- ४.९७ टक्के

अहमदनगर- ५.१३ टक्के

औरंगाबाद - ७.५२ टक्के

बीड - ६.७२ टक्के

मावळ -५.३८ टक्के

पुणे - ६.६१ टक्के

रावेर - ७.१४ टक्के

शिर्डी -६.८३ टक्के

Shirdi : शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बजावला मतदानाचा हक्क आहे.

भाऊसाहेब वाकचौरे यांनी सहकुटुंब मतदान केलं.

भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत.

Beed Lok Sabha : बीडमध्ये बजरंग सोनवणे यांनी केलं मतदान

बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केलं मतदान

बजरंग सोनवणे यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी मतदारांना शांततेत करण्याचं आवाहन केलं.

Junnar News : जुन्नरमध्ये VVPAT मशीन बंद, मतदान प्रक्रिया ठप्प; कोल्हेंची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १४ येथे आमच्या पोलिंग एजंटला उपस्थित राहण्यास अधिकाऱ्यांकडून मज्जाव, कोल्हेंचा आरोप

मतदान केंद्र क्रमांक २३५ येथे VVPAT मशीन बंद , अजूनही मतदान प्रक्रिया सुरू झालेली नाही.

कृपया तातडीने लक्ष द्यावे, अशी तक्रार अमोल कोल्हेंच्या प्रतिनिधी केली याबाबत ईमेल निवडणूक आधिकाऱ्यांना केला आहे.

Pune News : पुण्यातील वडगाव शेरी भागातील केंद्रावर मतदान पुन्हा सुरु

पुण्यात वडगाव शेरी भागातील केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये दोनदा तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण युनिट बदलावे लागले. त्यामुळे काही काळ या केंद्रावर मतदान बंद होते. आता मतदान सुरळीत सुरू झाले आहे. वडगाव शेरीमध्ये असलेल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये पुन्हा मतदानाला सुरुवात झाली आहे.

Raver rain : रावेरमध्ये पाऊस, मतदारांसहित पोलिसांची झाली धावपळ

रावेर शहरात पावसाला सुरुवात झाली.

रावेरमधील सौ कमलाबाई यश अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या मतदान केंद्रावर पाऊस सुरू झाला.

त्यानंतर मतदारांसह बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे धावपळ झाली.

प्रचंड ढगांच्या गडगडात आणि कडकडाटसह हलका पाऊस सुरू झाला आहे.

Shirur News : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सहकुटुंब केलं मतदान

शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह कुटुंबियांनी मतदान केले. मोठ्या मताधिक्याने विजयी होईल अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

गोमाता आणि वडील स्व दत्तात्रय आढळराव पाटील यांचे दर्शन घेतलं. त्यानंतर शिवाजी आढळराव पाटील यांनी सहकुटुंब लांडेवाडीतील प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

Jalna lok Sabha : रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब केलं मतदान

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन शहरातील नवीन भोकरदनमधील मतदान केंद्रात सहकुटुंब मतदान केले. यावेळी पत्नी निर्मला दानवे चिरंजीव आमदार संतोष दानवे सून रेणू दानवे, नातू शिवम पांडे आदी उपस्थित होते.

Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलं मतदान

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मतदान केलं.

पुण्यातील कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांनी मतदान केलं.

चंद्रकांत पाटील याआधी कोल्हापूरचे मतदार होते.

Pune Lok Sabha : पुण्यात EVM मशीन बंद, मतदारांच्या लांबच लांब रांगा

पुण्यातील टिंगरेनगरमधील इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये मतदान मशीन बंद पडली

मतदानसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

मतदान प्रक्रिया थांबली

Nandurbar Election Voting LIVE : आमदार राजेश पाडवी यांनी बजावला मतदानाचा हक्क

शहादा तळोदा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून तळोदा तालुक्यातील त्यांचे मूळ गाव असलेल्या सोमावल या गावात सहकुटुंब त्यांनी मतदान केलं असून मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावं असं आव्हान देखील आमदार राजेश पाडवी यांनी केलेला आहे

Pune Election Voting LIVE : मुरली नक्कीच दिल्लीला जाईल, मोहोळ कुटुंबियांना विश्वास

मुरली नक्कीच दिल्लीला जाईल, असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. आज मतदानाला जाण्याआधी मुरलीधर मोहोळ यांच्या आई, पत्नी, बहीण यांनी त्यांना औक्षण केलं. तेव्हा या सगळ्यांची एकच प्रतिक्रिया होती.

Ahmednagar Election Voting LIVE : नीलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क, विरोधकांवर सोडले टीकास्त्र

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी हांगे या गावात आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतले आहे त्यामुळे आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झाले, असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत अमाप पैसा आणि प्रशासनाचा दुरूपयोग करण्यात आला असल्याचा आरोपही नीलेश लंके यांनी केला आहे

Pune Election Voting LIVE: कोथरूड येथील मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी

- पुण्यात कोथरूड येथील मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांग.

- ⁠मतदानासाठी मतदारांनी केली प्रचंड गर्दी.

- ⁠ कोथरूड मधील मतदान केंद्रावरती जवळपास एक किलोमीटरची रांग.

- ⁠ याच मतदान केंद्रावर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील देखील मतदान करणार आहेत.

- ⁠मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदार मोठ्या संख्येने रांग लावून मतदान केंद्रावरती थांबलेले होते.

Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE: चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी

चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

Nandurbar Election Voting LIVE: नंदुरबार लोकसभा मतदारसंघात थोड्याच वेळात मतदान

नंदुरबार जिल्हा हा राज्यातील पहिला मतदार संघ म्हणून ओळखला जातो. नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 1915 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यातच जिल्हाभरातील एकूण 19 लाख 70 हजार 327 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अवघ्या 25 मिनिटात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वतीने मतदान साहित्य सज्ज केले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त या असणार आहे

Beed Election Voting LIVE:  बीड जिल्ह्यात 21 लाख 42 हजार 547 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू असून आज बीड लोकसभेसाठी प्रत्यक्षात मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 2 हजार 355 मतदान केंद्रावर आज 21 लाख 42 हजार 547 मतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावणार असून खासदार निवडणार आहेत. तर या मतदान केंद्रावर 10 हजार 432 अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडणार आहेत.

दरम्यान बीड लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळाली असून यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा रंग देखील पाहायला मिळाला आहे. दम्यान या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पनाला लागली असून उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे. त्यामुळं आता 4 तारखेचा गुलाल कुणाचा ? हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे....

Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE: महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात थोड्याच वेळात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघात आज सोमवारी मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.