Shivsena MLA Disqualification Saamtv
महाराष्ट्र

Shivsena MLA Disqualification: केंद्रीय निवडणूक आयोगाला समन्स पाठवा..' ठाकरे गटाची मोठी मागणी, दोन्ही वकिलांमध्ये खडाजंगी; सुनावणीत काय घडलं?

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घटनेचा विचार करून अध्यक्ष यांना विभाजनापूर्वी पक्ष कोणाचा हे ठरवायचं आहे. पक्ष कोणाचा हे सिद्ध करण्यासाठी जबाबदारी माझी नाही आम्ही फक्त सहकार्य करत आहोत," असे ठाकरे गटाचे वकील म्हणाले.

सुरज सावंत

Shivsena MLA DisqualiFication Hearing:

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद पाहायला मिळत आहे. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत बाजू मांडत आहेत. आजच्या सुनावणीतही दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाल्याचे पाहायला मिळाले.

आजच्या सुनावणीत काय काय घडलं?

ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला 4 एप्रिल 2018 रोजी दाखल केलेल्या पत्रावरुन महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंवर प्रश्नांचा भडीमार केला. तसेच शिंदे गटाकडून या पत्रावर प्रश्न उपस्थित केले गेले. यावरुन ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आले आहे.

या पत्रामध्ये घटनेत दुरुस्ती झाली याचे निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आहे. जर घटनेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतील आणि दोन गट निर्माण झाले असतील तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर असलेली घटना अध्यक्ष म्हणून विचारात घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने या पत्राद्वारे केली. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावणीला बोलावण्यासाठी समन्स पाठवावे, असेही पत्रामध्ये म्हणले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकनाथ शिंदेंच्या ई- मेल आयडीवरुन वाद..

यावेळी शिंदे गटाच्या वकिलांकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलेली नोटीस ही चुकीच्या ई- मेल आयडीवर पाठवल्याचा आरोप ठाकरे गटावर केला. यावर तुम्ही एकनाथ शिंदे यांचा इमेल चुकीचा आहे म्हणू शकत नाही, तुम्ही सगळे बनावट आहे असं बोलणे चुकीचे आहे. असे ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत म्हणाले.

तसेच "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घटनेचा विचार करून अध्यक्ष यांना विभाजनापूर्वी पक्ष कोणाचा हे ठरवायचं आहे. पक्ष कोणाचा हे सिद्ध करण्यासाठी जबाबदारी माझी नाही आम्ही फक्त सहकार्य करत आहोत," असेही देवदत्त कामत म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar Fort : जुन्नरला जात असाल तर 'हा' किल्ला पाहायला विसरू नका, इतिहास अन् निसर्गाचा अनोखा संगम अनुभवाल

'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

Idli Bhaji Recipe : उरलेल्या इडलीपासून बनवा कुरकुरीत भजी, घरच्यांना आवडेल ही हटके रेसिपी

Coronary artery disease: तुमचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल; तरीही हृदयातील ब्लॉकेजचा धोका कसा ओळखायचा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

SCROLL FOR NEXT