Devendra Fadnavis News, Ambadas danve News  Saam Tv
महाराष्ट्र

सत्ता असताना फडणवीसांनी पाणी प्रश्नावर मोर्चा का काढला नाही ? दानवेंचा निशाणा

औरंगाबाद पाणी प्रश्नाचा मुद्दा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : औरंगाबाद पाणी प्रश्नाचा मुद्दा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यानंतर औरंगाबाद पाणी प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यामुळे राज्यात फडवीसांच्या नेतृत्वात काढलेला जल आक्रोश मोर्चा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर आता शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे (Maharashtra Politics News In Marathi )

अंबादास दानवे म्हणाले, 'मी सध्या सोलापुरात आहे. सोलापुरात भाजपचे दोन खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री देखील राहिले आहेत, तरी देखील सोलापुरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सोलापुरात नऊ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो, त्यामुळे फडणवीसांनी सोलापुरात देखील मोर्चा काढायला हवा'. (Devendra Fadnavis News)

'जालन्यामध्ये रावसाहेब दानवे २० वर्षांपासून नेतृत्व करतात, बबनराव लोणीकर हे पाणी पुरवठा खात्याचे मंत्री होते.जर पाण्याच्या प्रश्नावर मोर्चा काढायचा होता. तर दानवे यांनी वीस वर्षात काय केले, लोणीकर पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांनी काय केलं? सत्ता असताना देवेंद्र फडणवीसांनी पाणी प्रश्नावर मोर्चा का नाही काढला?, त्यामुळे मला वाटतं की आजच्या सरकारला दोष देण्याची गरज नाही', असा टोला दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार चालवण्यावरून फडणवीसांनी टीका करण्यात आली होती. त्यावरून दानवे म्हणाले, 'विरोधी पक्षनेत्यांनी उद्विग्नेतून हे वक्तव्य केले आहे.उद्धव ठाकरे कार, सरकार सर्व काही चालवतात. कोरोना काळात सर्वात चांगले काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव होते, आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कार चालवतात, सरकार चालवतात त्यासाठी फडणवीसांच्या सर्टिफिकेटची गरज नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT