Uday Samant  Saam Tv
महाराष्ट्र

राणा दाम्पत्य-राऊतांच्या भेटीवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

शिवसेना नेत्यांच्या आणि राणा दाम्पत्याच्या भेटीबाबत काय म्हणाले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ?

साम न्यूज नेटवर्क

अमरावती : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यासोबत लडाख मध्ये भेट झाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. शिवसेना नेत्यांच्या आणि राणा दाम्पत्याच्या भेटीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी प्रतिक्रिया दिलीय. अमरावतीत माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) व यशवंतराव चव्हाण यांनी दिशा दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक भाग आहे. एकत्र जेवायला बसले याचा अर्थ तत्व सोडली असे होत नाही, म्हणून मला असे वाटते की, त्यांच्यासोबत त्या ठिकाणी संवाद साधला तो राजकीय संस्कृतीचा भाग आहे.

आगाणी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांची घोषणा नुकतीच करण्यात आलीय. याबाबतही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करु. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही, कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख आम्हाला आदेश देत असतात, पक्षप्रमुखांनी जो आदेश दिलेला आहे, त्याचे पालन आम्ही सर्व आमदार करणार आहोत, असं वक्तव्य सामंत यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. ते अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतन अमरावती महाविद्यालयाचा 20 वा पदवीका प्रदान समारंभात बोलत होते.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून उमेदवारीची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्याआधी शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची अटही संभाजीराजे छत्रपती यांना घालण्यात आली होती. परंतु, संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी नुकतंच घोषीत करण्यात आलं.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT