Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest News Saam TV
महाराष्ट्र

आताची सर्वात मोठी बातमी! प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या...; एकनाथ शिंदे यांचं ट्विट चर्चेत

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ५० समर्थक आमदारांसह बंडाचं निशाण फडकावून गुवाहाटीत तळ ठोकून बसले आहेत. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. शिवसैनिक शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा तीव्र निषेध व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत तमाम शिवसैनिकांना (Shivsena) आवाहन केलं आहे. प्रिय शिवसैनिकांनो,नीट समजून घ्या. महाविकास आघाडीचा खेळ ओळखा. मविआच्या (mva government) अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे.हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरीता समर्पित.आपला एकनाथ संभाजी शिंदे, असं ट्विट करुन एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. म्हणूनच या विचारधारेसाठी केलेल्या या बंडाच्या भूमिकेला पक्षातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार आणि १० सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन आहे. पण त्यांच्याकडून दाद न मिळाल्याने आम्ही आमचे नेते एकनाथजी शिंदे यांस ही स्पष्ट भूमिका घेण्याचा आग्रह धरला. आमच्या मतदारसंघात आमचे प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस, आमच्या पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरुद्धच लढाई आहे. या भूमिकेतूनच आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांस विनंती केली की, नैसर्गिक युती व्हावी.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० समर्थक आमदारांसह बंडाचं निशाण फडकावून गुवाहाटीत तळ ठोकून बसले आहेत. शिंदे गटाने केलेल्या बंडाळीमुळं महाराष्ट्राच्या राजकारण अभूतपूर्व घडामोडी घडत असून महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्याकडे आमदारांचे संख्यबळ असल्याने ते नवनवीन राजकीय डावपेच आखून राज्य सरकारची कोंडी करत आहेत.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Cucumber Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय; एकदा करुन बघाच

शेतकरी हळहळले! विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यु,10 लाखांचे नुकसान

Kothimbir Vadi: पावसाळ्यात बनवा खमंग, कुरकुरीत कोथिंबीर वडी; हटके रेसीपी

Pandharpur Drought : पाणी नसल्याने द्राक्षबाग सुकली; दुष्काळामुळे बाग काढण्याची शेतकऱ्यांवर वेळ

SCROLL FOR NEXT